मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबई : डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन व लोकमान्य मंडळ, माटुंगा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बँक्वेट हॉल, लोकमान्य नगर, माटुंगा ( पश्चिम ) येथे सुरु असलेल्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शिवतारा कॅरम क्लबच्या फहिम काझीने मुंबई महानगरपालिकेच्या विकास धारियावर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ०-२५, २०-१०, २५-११ असे नमवून विजेतेपद पटकाविले. तर दुसरीकडे आपल्या अनुभवाच्या जोरावर इंडियन ऑईलच्या काजल कुमारीने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लबच्या रिंकी कुमारीचा २५-१, २५-१३ असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्यांना लोकमान्य मंडळाचे कार्याध्यक्ष मनोहर गोडसे, लोकमान्य नगरचे कार्याध्यक्ष सुहास बेडेकर, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार, उपाध्यक्ष केतन चिखले, मानद सरचिटणीस अरुण केदार व सहसचिव संजय बर्वे यांच्या हस्ते रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरुष एकेरी गटाचे उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे

विकास धारिया ( मुंबई महानगरपालिका ) वि वि ओमकार टिळक ( ए. के. फाउंडेशन ) ५-२३, १८-१७, १९-५

फहिम काझी ( शिवतारा कॅरम क्लब ) वि वि प्रशांत मोरे ( रिझर्व बँक ) २५-८, ०-२५, २५-१२

महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे

काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि वैभवी शेवाळे ( डी. के. सी. सी.) २०-२, २५-०

रिंकी कुमारी ( पोस्ट ऑफिस रिक्रिएशन क्लब ) वि वि अंबिका हरिथ ( रिझर्व्ह बँक )  ०-२५, १९-१४, २२-०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *