अनिल ठाणेकर

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघ अंतर्गत ठाणे विधानसभा मतदारसंघातील  मतदान व्यवस्थेत अव्यवस्था,.ना पिण्याचे पाणी, ना पंखे, मतदारांच्या अंगावरुन वाहत होत्या घामाच्या धारा. मतदारांच्या या प्रचंड परवडीला जबाबदार संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय सचिव महाराष्ट्र समन्वयक डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे.

ठाणे लोकसभा मतदार संघांतील ठाणे विधानसभा क्षेत्रातीलमतदारसंघात कोलशेत -ढोकाळी येथिल श्री. शरदचंद्र मिनी स्पोर्ट्स कॅाम्पलेक्समध्ये बॅडमिंटन हॅालमध्ये तात्पुरते तंबू उभारून मतदानाचे ४ बुथ्स – बुथ क्र. ११७ ते १२० – उभारले होते. येथे सकाळी ७ः१५ ते ८ः४५ अशी दीड तास रांग लावल्यावर मतदार मतदान करू शकले. सर्व बुथ्सवर प्रचंड रांगा. बॅडमिंटन हॅालमध्ये ४ बुथ्सचे मिळून साधारणतः हजार एक स्त्री – पुरुष मतदार रांगेत उभे होते. तापमान होतं ३३ डिग्री सेल्सियस व आद्रतेमुळे जाणवत होतं ३९ डिग्री सेल्सियस. सर्व जण रांगेत उभे राहिल्यावर ५ च मिनिटात घामाने निथळत होते. नंबर लागे पर्यंत तासाभरात घामाची नखशिखांत आंघोळ! ना पंखे ना पिण्याचं पाणी ना वरीष्ठ नागरिक व दिव्यांगांना बसण्यासाठी खुर्च्यांची सोय.दुपारी तापमान ३८-३९ पर्यंत गेले होते.म्हणजे जाणवणारं तापमान ४५ डिग्री सेल्सियस होते. मतदानाचा हक्क बजावायला आलेल्या नागरिकांची ही परवड झाली होती. या परवडीला जबाबदार अधिकार्‍यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करावी अशी मागणी डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *