ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ठिकठिकाणच्या बूथला भेट देऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी मेहनत घेतली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी शहरातील बूथला भेट दिली. तेथील भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मतदानाची माहिती घेतली. तसेच त्यांना विविध सूचना दिल्या. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
