खर्डी : शहापूर विधानसभा मतदारसंघातील खर्डी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या महिलांच्या लहान मुलांसाठी अंगणवाडी सेविकेच्या साहाय्याने पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली होती. मुलांसाठी खेळणी व खाऊची सोय करण्यात आली होती.
आजनुप ग्रामपंचायतमधील बोण्डरपाडा, भेरेपाडा, दापूर, माळ कातकरीवाडी येथील मतदारांची नावे इतर वाड्यांमधील केंद्रांवर गेल्याने मतदारांची गैरसोय झाली; मात्र मतदारांनी रखरखत्या उन्हात मतदान केंद्र गाठून आपला हक्क बजावला. मतदारांना मनस्ताप सहन करावा लागल्याने पुढील निवडणुकीतही अशीच व्यवस्था असल्यास मतदान करणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच पुढील निवडणुकीसाठी नवीन सर्वेक्षण करून मतदारयाद्यांची छाननी करावी. मतदार राहत असलेल्या ठिकाणची खात्री करून मतदारयाद्या तयार कराव्यात, अशी मागणी उपसरपंच अजय कथोरे यांनी केली आहे.
