शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला

नागपूर : विदर्भात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय. केळी पिकाचे मोठे नकसान झाले आहे.

अकोल्यात काल रात्रीच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसासह गारपिट आणि वादळी वाऱ्यामुळे धामणगाव आणि पणज शेतशिवारात केळी पिकाचे मोठं नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे वाशिम शहरात दुपारच्या सुमारास बरसलेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम कृषीउत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला धान्य भिजल्याच चित्र बघायला मिळालंय. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.

वाशिम जिल्ह्यात अनेक भागात वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम, तर कुठे जोरदार अवकाळी पाऊस बरसला. रिसोड तालुक्यात काल संध्याकाळी पाचवाजेच्या सुमारास वाकद परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल असून रिसोड मेहकर मार्गावर वाकद गावाजवळ भले मोठे झाड रस्त्यावर पडल्याने जवळपास तासभर वाहतूक सेवा ठप्प झाली होती. तर अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *