ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने

१० हजार प्रतिनिधी येणार, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

अनिल ठाणेकर

ठाणे : गृहनिर्माण संस्थांच्या पुर्नविकासात विविध समस्या व अडचणीबाबत चर्चा तसेच, मार्गदर्शन करण्यासाठी ७ जून ते ९ जुन या कालावधीत ठाण्यातील कोकणी पाडा, उपवन तलाव येथील मैदानात भव्य वातानुकुलीत मंडपात “गृहनिर्माण संस्थाचे महाअधिवेशन” व प्रदर्शन आयोजित करण्यात रोजी आले आहे.सुमारे आठ ते १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत तसेच अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित राहतील, अशी माहिती ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी दिली.

ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे ठाणे जिल्हयातील पहिलेच महाअधिवेशन असुन सुमारे आठ ते १० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी ७ जून रोजी उदघाटन सोहळा, शनिवारी ८ जून रोजी महाअधिवेशन आणि ९ जून रोजी प्रदर्शन व सायंकाळी समारोप होईल..कार्यक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असुन उपस्थितांच्या अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली असुन यावेळी गृहनिर्माण सोसायट्यांकरीता लागणारे किट दिले जाणार आहे. ठाण्यातील उपवन येथे प्रथमच होत असलेल्या या भव्य अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, गटनेते प्रविण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, सहकार आयुक्त आदीसह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. या अधिवेशनात गृहनिर्माण संस्थांचा पुर्नविकास, त्याचबरोबर त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणांनी रखडलेले पुर्नविकास प्रकल्प, स्वयंपुर्ण विकासाच्या समस्या व स्वयंपूर्ण विकासासाठी अर्थसाह्य, वारंवार खोट्या तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी, गृहनिर्माण संस्थांच्या सहकार कायद्याबाबत सुधारणा तसेच, आवश्यक ते बदल या बरोबरच गृहनिर्माण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या तसेच अडचणी आदी विषयांवर मार्गदर्शन करून त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा देखील केला जाणार आहे.तसेच,या अधिवेशनात यासंदर्भातील वेगवेगळे ठराव देखील पारित केले जाणार आहेत. दरम्यान, महाअधिवेशनात आयोजित प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थासाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स, विकासक,अर्थसाह्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन हॉर्वेस्टींग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत. तेव्हा, ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठया संख्येने उपस्थिती दर्शविण्यासाठी नोंदणी करावी,अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.

चौकट

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पहिल्याच महाअधिवेशनात गृहनिर्माण संस्थांसाठी सहकार कायदा, पुनर्विकासबद्दल व स्वयंपुनर्विकास संबंधित समस्या या विषयावर ठराव मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी https://bit.ly/thanehousingmaha adhiveshan2024 या लिंकवर ३० मे, २०२४ पूर्वी आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. असे आवाहन सीताराम राणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *