‘श्रीमंताच्या मुलाला निबंध अन् ट्रक चालकांना १० वर्षाची शिक्षा’ ?
पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात मद्यप्राशन करून अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवून धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला तत्परतेने विशेष हॉलिडे कोर्टात हजर केले. पोलिसांनी थातुरमातूर पुरावे दिल्याने कोर्टानेही केवळ ३०० शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा ठोठावत या श्रीमंत बिल्डरच्या मुलाला अल्पवयीन असल्याची सबब देत लगोलग जामीन दिला. या निर्णयावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी संताप व्यक्त करीत एक व्हिडीओ जारी करीत मोदी सरकार आणि त्यांच्या व्यवस्थेला सवाल विचारला आहे ?…
“दोघांचा बळी गेल्यानंतर तु्म्ही श्रीमंत घरातील मुलाकडून निबंध लिहून घेता म्हणत राहुल गांधींची पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला. जर बस, ट्रक, ओला, उबर किंवा रिक्षा चालकाकडून झालेल्या अपघातात एखाद्याचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांचा तुरुंगवास सुनावला जातो. पण १६ ते १७ वर्षांचा श्रीमंत कुटुंबातील मुलगा जेव्हा दोघांचे प्राण घेतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितलं जातो. ट्रक आणि ओला चालकांना अशी निबंध लिहिण्याची शिक्षा का दिली जात नाही? न्याय हा सर्वांसाठी समान हवा. यासाठीच आम्ही संघर्ष करतोय. आम्ही न्यायासाठी लाढत आहोत. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठीही समान न्याय हवा,” असे राहुल गांधींनी म्हटलं आहे.
“नरेंद्र मोदींनी या देशात दोन भारत बनवले जात आहेत, एक अब्जाधीशांसाठी, आणि दुसरा गरिबांसाठी. असे का असा प्रश्न आम्ही विचारतो तेव्हा मोदीं यांचे उत्तर असते की मग काय मी सर्वांना गरीब करू का? . सध्या प्रश्न हा नाही, प्रश्न न्यायाचा आहे. न्याय गरीब-श्रीमंत सर्वांना सारखाच असला पाहिजे. यासाठीच आम्ही लढत आहोत. अन्यायाविरुद्ध लढत आहे,” असेही राहुल गांधी म्हणाले.
मार्फत पुणे अपघात प्रकरणी आपला रोष व्यक्त केला आहे.
आरोपीला जामीन मिळाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे सरकारने मात्र कोर्टाची भूमिका धक्कादायक असल्याचे म्हटलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्कळ पुणे गाठत पोलिसांना कठोर कारवाई करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर चक्र वेगाने फिरून आज त्या मुलाचा जामीन रद्द झाला होता.
या मुलाला जामीन मिळावा म्हणून अजित पवार गटाचे स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांनी मध्यस्थी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. काँग्रेसचे आमदार धंगेकर यांनी हे प्रकरण उचलून धरले आहे.