नालासोपारा येथील घटना

मुंबई : कपिल शर्मा शो हा छोट्या पडद्यावरच्या सोनी वाहिनीवरचा लोकप्रिय शो आहे. या सीरियलमध्ये काम मिळवून देतो असं सांगत आनंद सिंह नावाच्या एका माणसाने एका विवाहितेवर बलात्कार केला. नालासोपारा या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंद सिंह असं आरोपीचं नाव आहे. आनंद सिंह नालासोपारा या ठिकाणी राहतो. सिनेसृष्टीत आणि मालिका विश्वात माझी ओळख आहे. कपिल शर्मा शो मध्ये तुला काम देतो असं आमीष दाखवून आनंद सिंहने विवाहितेला घरी बोलवलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. २० मे रोजी ही घटना घडली आहे. विवाहित महिला जेव्हा आनंद सिंहच्या घरी गेल्यानंतर तिने घडणाऱ्या प्रकाराला विरोध दर्शवला मात्र आनंद सिंहने तिला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. तसंच या प्रकाराची वाच्यता केलीस तर तुला जिवे मारेन अशी धमकीही त्याने दिली.

पोलिसांनी काय सांगितलं आहे?

या सगळ्या प्रकारानंत पीडित महिलेने पोलीस ठाणं गाठलं. तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. आरोपीच्या विरोधात कलम ३७६, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी आनंद सिंहला पोलिसांनी अटक केली. कलाकार आणि कास्टिंग डायरेक्टरसाठी मी काम करतो असा दावा करणाऱ्या आनंद सिंहला अटक करण्यात आली आहे असं तुळींज पोलीस ठाण्याच्या रोहिणी डोकेंनी सांगितलं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

सोनी टिव्हीवरील द कपिल शर्मा शो हा मनोरंजनाचा निखळ कार्यक्रम मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. आता हा कार्यक्रम ओटीटी माध्यमांवरही आलाय. या कार्यक्रमात काम देतो, असं आमिष या नराधमाने त्या महिलेला दाखवलं. काम करण्याच्या इच्छेपायी ती महिलाही त्याच्या बोलण्याला फसली. त्याने २० मे रोजी तिला घरी भेटायला बोलावलं. त्याचवेळी तिच्यावर बलात्कार केला.

आनंद सिंह आणि विवाहितेची ओळख कशी झाली?

आनंद सिंह आणि या महिलेची ओळख एका कॉमन मित्राद्वारे झाली होती. तुला मी कपिल शर्मा या कॉमेडी शोमध्ये काम मिळवून देतो पण तुला ऑडिशन द्यावी लागेल असं सांगितलं. तू माझ्या घरी ये तुला ऑडिशन द्यावी लागेल. त्यात तू पास झाली तर मी कास्टिंग डायरेक्टरला तुझी ऑडिशन दाखवतो मग ते तुला कपिल शर्मा शोमध्ये निवडतील असं सांगितलं. त्या बहाण्याने तिला घरी बोलवलं. २० मेच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी नालासोपारा या ठिकाणी असलेल्या गणेश अपार्टमेंट या ठिकाणी तिला बोलवलं आणि तिच्यावर बलात्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *