मुंबई : तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती २५६८वी नांलदा बौध्द सेवा संघ रजि.यांच्या वतीने सिमलानगर मलबार हिल येथे नांलदा बौध्द सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बौद्धाचार्य समाजभूषण-सो ना कांबळे गुरूजी यांच्या अध्यक्षतेखालील मोठया उत्साहात संपन्न झाली प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव क्रांतिसूर्य बौद्धीसत्व प पूज्य विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेला पुष्प अर्पण,मेनबती व आगरबती प्रज्वलित उपस्थितीत मान्यवरांच्या शुभहस्ते करून बुद्धवंदना पूजापाठ करून तथागत भगवान गौतम बुद्ध व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देवून विनम्र अभिवादन करण्यात आले. सदर बुद्ध जयंती कार्यक्रम आयोजन नालंदा बौद्ध सेवा संघाचे सरचिटणीस बी जी गायकवाड गुरूजी यांनी करून सूत्रसंचालन केले. सदर प्रसंगी समाजभूषण बौद्धाचार्य सो ना कांबळे गुरूजी यांनी तथागत भगवान गौतम बुद्धाची महती सांगताना म्हणाले की,बुद्धांच्या आयुष्यातील जन्म,संबोधीप्राप्ती (दिव्यज्ञान)आणि महापरिनिर्वाण या महत्वपूर्ण तीन घटना वैशाख पौर्णिमेस घडल्या असल्याने जगभरातील बौध्दांसाठी संपूर्ण वैशाख महिना बुद्ध जयंती किंवा वेशाक या नावाच्या महोत्सवाचे एक महापर्वच मानले जाते. जगातील लोकांनी बुद्ध तत्वज्ञान घेऊन गगनभरारीतून विकास झाला आहे, “जगाने बुद्ध स्विकारला म्हणून जगप्रगतीपथावर गेले आहे.त्यात भारत मागे असून डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्या मार्गानुसार बुद्ध धम्म भारताने स्विकारला तर भारत बौध्दमय होईल उद्याचे दिवस सोन्याचे भारतात उगवतील” असे कांबळे यांनी ठणकावून सांगुन ते पुढे म्हणाले की,भगवान गौतम बुद्ध मुक्तीदाते नसून मार्गदाते आहेत जगातला युध्द नको बुद्ध हवा! शांती संदेश हवा हिच खरी दवा व दुवा असल्याचे आवर्जून आपल्या प्रदीर्घ प्रवचनात सांगून “जग मै है बुद्ध नाम! यह है भारत शान है!” बुद्धाचे विचार जगाला कळले, बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमचे मन बुद्धाकडे वळले म्हणूनच आज आम्हाला दिवस चांगले आले आहेत बुद्धाच्या विचाराने जगाचा उध्दार झाला त्याच प्रमाणे बरोबर आपलाही उध्दार बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधान व बौद्ध धम्मातून झाल्याचे सो ना कांबळे यांनी आवर्जुन सांगून बुद्ध जयंती निमित्त उपस्थितीतांना शुभेच्छा दिल्या सदर प्रसंगी मलबार हिल पोलीस ठाण्याचे सिनियर सन्मानीय श्री उदयसिंग शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मीलस्पेशल श्री सचिन वाघमारे,श्री प्रविण चौगुले,श्री मधुकर नामदेव बागुल पोलीस हवालदार बीट न॔बर तीन सिमलानगर चौकी,महाराष्ट्र सुरक्षा बळ,श्री उमेश तोंडे,निलेश महाले आदि पोलीस स्टाॅप वर्गा बरोबर बुद्ध जयंती उत्सव सोहळा यशस्वी करण्याकरीता सर्वश्री सिध्दार्थ जगताप, दिपक लामतुरे,एस टी घुमरे,भीमराव सुर्यवंशी,श्रीम चांगुनाबाई रघुनाथ लामतुरे,श्रीम सोजरबाई आनंद कांबळे,श्रीम ललिता मधुकर माने,सौ सुनिता सुर्यवंशी, राहुल माने आदीने परिश्रम घेतले सदर प्रसंगी बुद्ध वंदना व भगवान गौतम बुद्धांना मानवंदनाच्या कार्यक्रमातून मलबार हिल सिमलानगर परिसरातील वातावरण बौद्धमय मंगलमय भरगच्च सुत्यउपक्रम राबवून बुद्ध जयंती धुमधडाक्यात साजरी झाल्याचे नांलदा बौध्द सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण बौद्धाचार्य सो ना कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
