माथेरान : माथेरान मध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे लोंढे वहात असल्याने काही ठिकाणी मातीची धूप होते.रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ब्रिटिश कालीन मोऱ्या दरवर्षी मातीच्या भरावाने भरत असतात त्यामुळे पावसाळी पाणी थेट रस्त्यावरून वहात असते परिणामी रस्त्याची धूप होऊन महत्वाच्या भागातील खड्डेमय रस्ते होत असल्याने हातरीक्षा,घोडा तसेच पायी चालत जाणाऱ्या लोकांना खूपच त्रासदायक बनले होते यासाठी अनेक भागातील पावसाळी गटारांची साफसफाई करून चांगल्या पद्धतीने गटारे आणि मोऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे तर या मोऱ्यांवर बांधलेल्या कठड्याचा वापर पायी चालत जाणाऱ्या पर्यटकांना बसण्यासाठी होत आहे.

पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे आणि मोऱ्यांची कामे अत्यंत नियोजन पद्धतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे, स्वच्छता विभागाचे अन्सार महापुळे, एस.आई. नरेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली उत्तम प्रकारे मार्गी लावली जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *