लैंगिक छळ आणि आर्थिक भ्रष्ट्राचारप्रकरण

मुंबई, दि. २४ (प्रतिनिधी) – महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळप्रकरणी आणि विभागाअंतर्गत आर्थिक घोटाळाचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान अंतू पवार यांना निलंबित करण्यात आले  आहे . महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने ही कारवाई केली असून निलंबन काळात त्यांची जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे बदली करण्यात आली आहे.

डॉ. भगवान पवार यांच्याविरुध्द कंत्राटी महिलांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. पण त्या दडपण्यात आल्या होत्या. त्याशिवाय अनियमित कामकाज, अधिकारी/कर्मचा-यांसोबत अरेरावी, त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देणे, आर्थिक घोटाळ्यांचे गंभीर आरोप शासनास प्राप्त झाले होते. गेली दोन वर्षे या तक्रारी प्राप्त होऊनही कोणतीच  कार्यवाही झाली नव्हती   यावर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत  निलंबनाची कारवाई करण्यात आली. यानुसार २९ एप्रिल रोजी आरोग्य सेवा आयुक्तालयाने तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. पवार यांच्याविरुध्दच्या तक्रारींचे गंभीर स्वरुप पाहता निष्पक्ष चौकशी होण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4(1)(अ) मधील तरतुदीनुसार त्यांचे निलंबन करणे आवश्यक आहे असे समितीने शिफारस केली होती . त्यानुसार त्यांचे निलंबन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *