ठाणे रेल्वेस्थानकावरील धक्कादायक दुर्घटना

ठाणे : मोबाईल चोरीच्या घटनेमुळे तरुणाचे दोन्ही पाय रेल्वेखाली कापले गेल्याची दुर्देवी घटना २२ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानक फलाट क्रमांक २ च्या आसपास घडली आहे.

जगन लक्ष्मण जंगले ही ३१ वर्षीय व्यक्ती अशोकवन, चाळ क्रमांक ७, रूम नंबर ५, विजय नगर, अमराई, कल्याण पूर्व येथे राहतात..खाजगी कंपनीत कामाला असलेले जगन जंगले हे २२ मे रोजी रात्री ९ च्या सुमारास दादर स्टेशन वरून कामावरून सुटून ते कल्याण येथील आपल्या घरी परतत होते. यावेळी गर्दीमुळे कल्याण लोकलच्या दरवाजाजवळ जंगले उभे होते. यावेळी मोबाईल चोरीच्या उद्देशाने जगन जंगले यांयांच्या हातात असलेल्या मोबाईलवरील हातावर चोरट्यांनी जोरात फटका मारला. हा फटका जोरात बसल्याने जंगले यांचा तोल गेला व ते रेल्वे डब्यातुन खाली पडले. यावेळी धावती रेल्वे जंगले यांच्या दोन्ही पायावरुन गेली. नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले. ठाणे फलाट क्रमांक २ नंबर पासून अंदाजे २०० मिटर पुढे (कळव्याच्या दिशेने), सिडको बस स्टॉप च्या जवळील रेल्वे ब्रिजवर ही घटना घडली.

जगन जंगले रेल्वेतुन खाली पडल्यावर सोबतच्या प्रवाशांनी आरडाओरड करुन, चैन खेचून रेल्वे थांबविली. यानंतर ठाणे फलाटावरील रेल्वे पोलीस व कर्मचारी धावत आले. त्यांनी जगन जंगले यांना ठाणे येथील हायलॅण्ड हाॅस्पिटल या इस्पितळात दाखल केले. जगन जंगले यांचे प्राण वाचले असले तरी मोबाईल चोरीच्या घटनेत त्यांचे दोन्ही पाय मात्र कायमचे गेल्याने पुडील आयुष्य अपंग म्हणूनच जगन जंगले यांना जीवन कंठावे लागणार आहे. जगन जंगले यांच्या घटनेवरुन बोध घेऊन तरी ठाणे रेल्वे पोलीसांनी सतर्क राहून रेल्वे फलाटावरील मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करावा व प्रवाशांची सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी रेल्वे प्रवाश्यांची मागणी आहे. कोकणातील निसोबाचा सडा, आडवली स्वामी समर्थ मठाजवळ, पळसंब खालची वाडी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग येथील जगन जंगले हे रहिवासी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *