मॉर्डन इन्फ्रास्ट्रक्चरने सजलेल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीसह व्यवसायाची उत्तम संधी,

कुटुंबासाठी हवेहवेसे ‘वाईब्स’ रितेश म्हात्रे व राजेश म्हात्रे यांनी उतरवले सत्यात

राज भंडारी

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा अटल सेतू उरण, पनवेल, नवी मुंबईसाठी वरदान ठरला आहे. अवघ्या 25 मिनिटात नवी मुंबई गाठता येत असल्यामुळे अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प या भागाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत. उरण शहरातील ‘ग्रँड उरण सेंट्रल’ हा प्रोजेक्ट रितेश म्हात्रे व राजेश म्हात्रे या दोघांनी सत्यात उतरवून उरणच्या विकासाला हात घातला आहे.

उरणचा चेहरामोहरा बदलवून टाकणारा हा प्रकल्प उरणमध्ये उभा राहत आहे. या रेरा अप्रोव्हड प्रोजेक्टमध्ये अपग्रेडेड लाईफ स्टाईल, अपग्रेडेड फ्युचरसाठी गुंतवणूक करणे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. अटल सेतूपासून अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असलेला ‘ग्रँड उरण सेंट्रल’ विविध सोयीसुविधांनी उपयुक्त असा आहे. ‘अल्टो फिन’ ही नवी मुंबईतील विकासकांमध्ये नावाजलेली संस्था हा उरणचा कायापालट करणारा प्रीमियम कमर्शिअल प्रोजेक्ट उभारतेय. उरणच्या मातीची चांगली जाण असलेले स्थानिक विकासक रितेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे या भावांनी उरणच्या परिवर्तनासाठी पाहिलेले हे सर्वांग सुंदर असे स्वप्नातील ‘ग्रँड उरण सेंट्रल’ आता प्रत्यक्षात उभे राहणार आहे. सहज परवडेल असा पण अत्यंत सुंदर असं मॉर्डन इन्फ्रास्ट्रक्चर असलेला हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमध्ये प्रीमियम शॉप्स, ऑफिसेस, घरं आणि बरचं काही मिळणार आहे. हा प्रोजेक्ट फक्त कमर्शिअल नसून रेसिडेंसिअल सुद्धा असणार आहे.

दिनांक २४ मे रोजी उरणच्या धर्तीवर अत्यंत सुंदर असा प्रोजेक्टचा लॉंचिंग सोहळा संपन्न झाला. उरण आणि परिसरातील नावाजलेल्या व्यक्ती, सर्वपक्षीय नेते, व्यावसायिक यांनी या कार्यक्रमात हजेरी लावून ‘ग्रँड उरण सेंट्रल’ प्रोजेक्टच्या भव्यतेची अनुभूती घेतली. मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि रेश्मा शिंदे यांची उपस्थिती देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.

‘ग्रँड उरण सेंट्रल’मध्ये अवघ्या ५,६०० रुपये per square feet प्रमाणे तब्बल १४०० square feet चे घर तुम्हाला अवघ्या ८९ लाखांमध्ये मिळून जाते. त्याच प्रमाणे शॉप आणि ऑफिसच्या किमती देखील अत्यंत किफायतशीर अशाच आहेत. अवघ्या ८,५०० रुपये per square feet सह ५% GST देऊन तब्बल २८० square feet चे शॉप २५.२५ लाखांत मिळते तर अवघे ९००० रुपये per square feet किंमतीसह ५% GST भरून तब्बल ३०० square feet चे शॉप गुंतवणूकदाराच्या हक्काचे बनते.

थाटात संपन्न झालेल्या प्रोजेक्ट लाँच सोहळ्याला उरणचे आमदार महेश बालदी, ठाकरे गट सेनेचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, रायगड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रशांत पाटील, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस तथा कोकण विभागीय अध्यक्षा भावना घाणेकर आदी नेत्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *