माथेरान : नुकताच अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील आदिवासी वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी नुकसान झालेले आहे. त्यातच वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले होते. याची माहिती मिळताच कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून कर्जत मतदारसंघात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक गावात , वाड्या वस्त्या मध्ये घरांचे नुकसान झाले होते या सर्व नागरिकांना आमदार महेंद्र थोरवे यांचा एक मदतीचा हात म्हणून एक कर्तव्य म्हणून नुकसान झालेल्या लोकांच्या घरासाठी सिमेंटचे पत्रे देण्यात आले.यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे तोंड भरून कौतुक केले व शुभ आशीर्वाद दिले आणि खरोखरच काळजी वाहू आमचा नेता, दमदार आमदार असे कौतुक केले आहे.
