अल्पवयीन मुलगा चालवित होता बीएमडब्ल्यू आणि बोनेटवर बसून मित्र करत होता स्टंट

कल्याण : पुण्यात अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत बाईकवरील दोघांना पोर्शे कारने चिरडून ठार मारल्यानंतरही श्रीमंतीचा माज काही उतरत नाही. आता कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलगा बीएमडब्लू कार चालवत होता आणि त्याचवेळी एक तरूण कारच्या बोनेवर बसून स्टंट करीत होता. हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायर झाल्यानंतर स्टंट करणाऱ्या तरुणाला कल्यण बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात स्टंटबाज तरुण शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे ही कार त्या अल्पवयीन मुलाच्या वडीलांची आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोर दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही बीएमडब्लू कार अल्पवयीन मुलगा चालवत होता. मात्र त्या कारच्या बोनेटवर एक तरुण पाय पसरुन मिजाशीत बसला होता. तो या कारच्या राईडचा आनंद घेत होता. भर रस्त्यात चालत्या कारच्या बोनेटवर बसून तो मजाक मस्ती करत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडिओ पाहताच बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या स्टंटबाज तरुणाचा शोध सुरु केला.  शुभम हा कल्याण पश्चिमेत राहतो. तर कार चालविणारा अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्वेत राहतो. ही कार अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्याला घेऊन दिली आहे. या दोघांना ताब्यात घेतले. शुभम मितालियासह अल्पवयीन कार चालकाच्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *