हिमाचल प्रदेश: मला देवानेच पाठवले असल्याचे मोदींनी एका मुलाखतीत सांगितले होते हाच धागा पकडत काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी मोदींवर कडवट टिका केली आहे. “ज्या व्यक्तीचा देवाशी थेट संबंध आहे, त्याला संविधानाची काय गरज? ते म्हणे थेट देवाशी बोलतात. मला तर थोडी भीती वाटते आहे. मला त्याला विचारायचे आहे की, मोदी जी, तुम्हाला जी काही भावना येते, ती सकाळी, संध्याकाळी की 24 तास असते?” असा टोलाही राहुल यांनी मोदींना लगावला.
यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीवरुनही जोरदार टिका केली. “आजकाल नरेंद्र मोदींच्या मुलाखती सुरू आहेत, ते चार चमचे बसवतात अन् ते प्रश्न विचारतात की, मोदीजी, तुम्ही आंबे कसे खाता? सोलून खाता की चोखून खाता?” मग मोदीजी उत्तर देतात की, मला माहित नाही, सर्व काही आपोआप घडते, देव मला मार्गदर्शन करतो. मी भारतातील एकमेव व्यक्ती आहे, ज्याचा देवाशी थेट संपर्क आहे. यावर चमचे म्हणतात व्वा, व्वा मोदीजी, काय मस्त बोललात. तुम्ही मीडियामध्ये शेतकऱ्यांबद्दल कधीच ऐकले नसेल, पण अंबानींचे लग्न नक्कीच पाहिले असेल. नरेंद्र मोदींनी देशात 22 अब्जाधीश निर्माण केले, आम्ही देशात करोडो करोडपती निर्माण करणार आहोत,” असं राहुल म्हणाले.
