रायगड जिल्ह्यामधील ७०० गावे स्वप्नातील करणार – जिल्हाधिकारी किशन जावळे
अशोक गायकवाड
रायगड : रायगड जिल्ह्यामधील ७०० गावे स्वप्नातील करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच निवी गावच्या विकासात शासन स्तरावरून जे जे सहकार्य अपेक्षित आहे ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशीही खात्री जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
शासनाच्या व स्वदेस फौन्डेशनच्या सहकार्यातून जिल्ह्यात आतापर्यंत स्वच्छ ,सुंदर, स्वस्थ, सक्षम, आत्मनिर्भर झालेली शंभर गावे स्वप्नातील गावे म्हणून घोषित केलेली आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे व प्रांताधिकारी डॉ.संदीपान सानप यांनी शुक्रवारी,(दि.२४ मे) रोजी माणगाव तालुक्यामधील निवी या गावाला भेट दिली व स्वदेस फाउंडेशन तर्फे गावांमध्ये सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. या गावाला स्वप्नातील गाव असे संबोधले जाते. रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड , पोलादपूर व सुधागड तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे काम गाव विकास समिती सहकार्यातून सुरु आहे .रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशन च्या वतीने रायगड जिल्ह्यामध्ये सध्या ७०० गावांमध्ये स्वच्छ ,सुंदर, स्वस्थ, सक्षम, आत्मनिर्भर या विषयावर आधारित स्वप्नातील गावे स्वदेस फौन्डेशनच्या व शासनाच्या सहकार्यातून बनत आहेत, आतापर्यंत शंभर गावे स्वप्नातील गावे म्हणून घोषित केलेली आहेत. गावभेटीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी किशन जावळे व प्रांताधिकारी डॉ.संदीपान सानप, नायब तहसीलदार अरविंद घेबुड ,गटविकास अधिकारी संदीप जठार व उपसंचालक तुषार इनामदार, प्रसाद पाटील, यांचे स्वागत गाव विकास समिती , महिला वर्ग तर शाळकरी मुला मुलींनी लेझीमच्या तालावर स्वागत केले यावेळी गावातील अंगणवाडी सौर उर्जा प्रकल्प , बकरी पालन शेतकरी, दुग्धव्यवसाय शेतकरी, मोतीबिंदू उपचार केलेल्या लोकांशी तसेच आरोग्य मित्र , ज्ञान मित्र , पशुमित्र, शेतकरी कंपनी संचालक,बँक सखी यांच्याशी जिल्हाधिकारी यांनी चर्चा केली तसेच गावातील वाचनालयाला भेट दिली व शिष्यवृत्तीधारक विध्यार्थीशी संवाद साधला. पूर्वी निवी गावामध्ये २ शेतकरी शेळीपालन करीत होते, आत्ता १४ शेतकरी शेळीपालन करीत आहेत. पूर्वी ३ शेतकरी दुग्धवयवसाय करीत होते आत्ता त्यांची संख्या ७ शेतकरी आहेत, व दुबार पीक २ शेतकरी घेत होते, आत्ता ३४ शेतकरी दुबार पीक घेत आहेत हे पाहून जिल्हाधिकाऱ्यांना आनंद झाला व त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी गावभेटी दरम्यान गाव विकास समितीने तयार केलेला गाव विकास आराखडा, गावचा सामाजिक व भौगोलिक नकाशा याची पाहणी केली तसेच स्वप्नातील गाव प्रक्रिये मध्ये करण्यात आलेली कामे , विकासासाठी केलेलं प्रयत्न त्यात आलेल्या अडचणी स्वदेस फौंडेशन दिलेली साथ शासकीय कामांचा पाठपुरावा समजून घेतला. स्वदेस फाउंडेशन चे उपसंचालक तुषार इनामदार यांनी स्वदेस च्या कार्यपद्धती व स्वप्नातील गाव यांच्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना आपल्या भाषणामध्ये गावकऱ्यांचे व गाव विकास समितीचे कौतुक केले व स्वदेस फाउंडेशन ने रायगड जिल्ह्यामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणी व स्वच्छता, आर्थिक विकास या विषयांवर केलेल्या कामाची प्रशंसा केली व रायगड जिल्ह्यामधील ७०० गावे स्वप्नातील करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच निवी गावच्या विकासात शासन स्तरावरून जे जे सहकार्य अपेक्षित आहे ते सर्व सहकार्य करण्यात येईल अशीही खात्री जिल्हाधिकारी यांनी दिली व पुढील काळात पुन्हा आपण निवी गावात शेतकरी, महिला, मुले, यांना भेटण्यासाठी येण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला गाव विकास समिती चे अध्यक्ष सदानंद बडेकर, गाव विकास समिती सचिव महेश बबरे, सरपंच वनिता जाधव, उपसरपंच सुरेश नाडकर , शेतकरी कंपनी संचालक सचिन नाडकर, आरोग्य मित्र समृद्धी नाडकर व स्वदेस फाउंडेशन चे वरिष्ठ व्यवस्थापक मेघना फडके, वरिष्ठ व्यवस्थापक नजीर शिकलगार, उप महाव्यवस्थपक वैभव पवार व विकास खरमांळे ,व्यवस्थापक शीतल सुर्यवंशी , वरिष्ठ समन्वयक राकेश पाखुर्डे उपस्थित होते. नीवी हे गाव स्वप्नातील गाव घडवण्यामध्ये स्वदेस फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, संचालक प्रदीप साठे व वरिष्ठ समन्वयक राकेश पाखूर्डे व गाव विकास समिती यांचा मोलाचा वाटा आहे.
