खारघर : संतुलित आणि सुरक्षित पर्यावरणासाठी केंद्र शासनाच्या शीघ्र कृती दलाच्या वतीने ५ मे ते ६ जूनदरम्यान ‘माय लाईफ’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाचे औचित्य साधून खारघरमधील १०२ शीघ्र कृती दलाच्या वतीने नुकतीच खारघरमध्ये सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत १०२ बटालियनचे कमांडर जतिन किशोर, चून्गीन हागसिंग, इंद्रनील दत्ता यांच्यासह इतर अधिकारी सहभागी झाले होते.
