मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील २४ तासांमध्ये हलक्या पावसाची शक्यता असून आकाश अंशत ढगाळ राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील २४ तासामध्ये कमाल तापमान 34 तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहील असंही सांगण्यात आलं आहे. आजपासून कोकणातील समुद्री पर्यटन येत्या ३१ ऑगस्टपर्यंत असे तीन महिने बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच मुरूड जंजिरा किल्लाही आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात मान्सूनचे आगमन हे १० जूनपर्यंत होणार असून या ठिकाणी मासेमारीसाठीही बंदी घालण्यात आली आहे.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. या भागात येत्या २४ तासांमध्ये हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.