१९६२ साली बांधला होता पूल
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील विरार-वैतरणा दरम्यान असलेल्या पुलाचे स्टील गर्डर टाकण्याचे काम शनिवारी मध्यरात्री यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेने हे काम आठ तासांऐवजी केवळ सहा तासात यशस्वीरित्या पूर्ण करून ही उल्लेखनीय कामगिरी केली.
पश्चिम रेल्वेने विरार-वैतरणा अप मार्गावरील पुल क्रमांक ९० चा स्टील प्लेट गर्डर टाकण्यासाठी शुक्रवारी रात्री १०.४० ते शनिवारी पहाटे ४. ४० वाजेपर्यत सहा तासांचा ब्लॉक घेण्यात आला. हा पूल १९६२ साली बांधलेला होता. त्यामुळे प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जुन्या पुलाचे चॅनल स्लीपर बदलणे गरजेचे होते.त्यामुळे पुलाचे स्टील गर्डर टाकण्याचे काम शनिवारी मध्यरात्री यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे विरार-वैतरणा सेक्शनमध्ये रेल्वे गाड्यांची गती वाढविने शक्य होणार आहे. हे काम सहा तासांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. या ब्लॉक दरम्यान इतर महत्वाची अभियांत्रिकी कामे पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली आहे. या कामामध्ये डब्यलूसीएमएस क्रॉसिंग टाकणे, प्लेन ट्रॅक टॅम्पिंग, स्विच एक्सपेन्शन जॉइंट्स, वेल्डिंग, बॅलास्ट अनलोडिंग इत्यादी कामाचे समावेश होता.
