नवी मुंबई : महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागा अंतर्गत  श्री. बजरंग महादेव गोळे, रूम नंबर 335 सेक्टर-15 कोपरखैरणे, नवी मुंबई व श्री. कारभारी रामभाऊ ढोले, रूम नंबर 122 सेक्टर 05, कोपरखैरणे, नवी मुंबई. यांनी महानगरपालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अनधिकृतपणे आर.सी.सी. स्वरूपाचे बांधकाम सुरू केले होते. अनधिकृत बांधकामास कोपरखैरणे विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, 1966 मधील कलम 54 अन्वये अनुक्रमे दि.29/02/2024 व दि.26/03/2024 रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. परंतु सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवले होते.

सदरची दोन्ही अनधिकृत बांधकामे आज दिनांक 24/05/2024 रोजी निष्कासित करण्यात आलेली आहेत. या धडक मोहिमेसाठी कोपरखैरणे विभागाकडील अधिकारी/कर्मचारी, 08 मजूर, 01 गॅस कटर, 02 ब्रेकर, 1 पीकअप व्हॅन कारवाई करीता वापर करण्यात आले. तसेच अतिक्रमण विभागाकडील पोलिस पथक तैनात होते. यापुढे देखील अशा प्रकारे अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *