लाहोर : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्डकपसाठी बाबर आझमच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या संघात मोहम्मद आमिरचं कमबॅक झालेय. त्याशिवाय मोहम्मद रिझवान आणि हॅरिस रौफ यांना ताफ्यात संधी दिली आहे, पण त्यांच्या फिटनेसबाबत पीसीबी चिंतेत आहे. पाकिस्तानच्या ताफ्यात फिरकी अष्टपैलू मोहम्मद नवाज याला स्थान देण्यात आलेले नाही.
टी20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ :
बाबर आजम (कर्णधार), अब्रार अहमद, आजम खान, फखर जमान, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सैम अय्यूब, शादाब खान, शाहीन शाह अफरीदी, उस्मान खान.