माथेरान : सनियंत्रण समितीने सध्या वीस ई रिक्षांना पायलट प्रोजेक्ट वर परवानगी दिली होती परंतु यामध्ये एकूण २३ जणांनी आपले फॉर्म भरले होते.याकामी वीस जणांना अधिकृतपणे या ई रिक्षा मिळण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दि.२७ रोजी सायंकाळी पाच वाजता सोडत काढण्यात आली यामध्ये वीस जणांना सध्या सुरू होणाऱ्या पायलट प्रोजेक्ट साठी लाभ मिळाला आहे.यावेळी नगरपरिषदेचे अंकुश इचके, सदानंद इंगळे उपस्थित होते तर २३ हातरीक्षा चालक, मालक सुध्दा सोडतीच्या वेळी समक्ष हजर होते.
अनेक दिवसांपासून ई रिक्षाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. सुरुवातीला सनियंत्रण समितीने वीस ई रिक्षासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून परवानगी दिली होती त्यावेळी पंधरा ई रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना आणि उर्वरित पाच ई रिक्षा पर्यटकांना, स्थानिक,आबालवृद्ध,दिव्यांग यांना वापरण्यात याव्यात असे सूचित केले होते. त्यावेळी आपला यामध्ये तोटा होणार आहे ही बाब लक्षात घेऊन काहींनी अंग काढले होते तर आज ना उद्या सर्वांना ई रिक्षा मिळणार आहेत त्यामुळे डेरिंग करून वीस जणांनी हा कोटा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता फॉर्म भरण्यात आले होते.अखेरीस यातील वीस जणांना लाभ झाला असून उर्वरित ७४ जणांना ह्या पायलट प्रोजेक्ट नंतर टप्प्याटप्प्याने लाभ घेता येणार असल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती च्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल असल्याचे हात रिक्षा चालकांचे मत व्यक्त केले.
हात रिक्षाच्या अमानवीय प्रथेतून मुक्ती होणार असून ई रिक्षा मुळे आमच्या जीवनात बदल होणात आहे तसेच माझे अन्य हात रिक्षा बांधव त्यांना देखील लवकर ई रिक्षाचा परवाना मिळावा तेव्हाच श्रमिक रिक्षा संघटनेच्या लढ्याला यश मिळे.
मारुती कदम—- हातरिक्षा चालक
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ई रिक्षाची सोडत काढण्यात आली. सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.सोडतीमध्ये वीस जणांना सध्या या रिक्षाचा लाभ होणार आहे यामध्ये कुणाची हरकत वा तक्रार असल्यास दोन दिवसांत नगरपरिषदेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात द्यावी. या ई रिक्षाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे.
राहुल इंगळे—प्रशासक तथा मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद
