मुंबई : मुंबईत होणाऱ्या प्रसिद्ध कांगा लीग क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथमच कल्याणमध्ये खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.
कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना पुढे जाण्याची संधी आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक इच्छुक क्रिकेटपटू नेहमीच उत्सुक असतात. यंदा प्रथमच कल्याण विभागातील क्रिकेटपटूंची निवड कल्याणमध्येच होणार आहे.
निवड प्रक्रिया शुक्रवार, 31 मे रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल. निवड प्रक्रिया युनियन क्रिकेट अकादमी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर, वाली नगर, कल्याण पश्चिम येथे होणार आहे. कांगा लीग ‘एफ’ क्रिकेट संघ निवडीसाठी वयाचे कोणतेही बंधन नाही. तरी या निवड चाचणीसाठी इच्छुक खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन युनियन क्रिकेट अकादमीचे तुषार सोमाणी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९३२३८९०१८९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
