चार अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम केले सुरू

उल्हासनगर : एकीकडे महानगरपालिकेने 336 धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या शक्यतेची दक्षता घेऊन उल्हासनगरातील 4 अतिधोकादायक इमारतींचे पाडकाम करण्याची सुरवात आजपासून करण्यात आली आहे.

संपूर्ण शहरात कॅम्प 1 ते 5 परिसरातील प्रभागनिहाय 336 घोकादायक इमारतींची यादी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रसिध्द केली आहे.सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना अधिनियमातील तरतुदीनुसार सहायक आयुक्त यांच्यामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

तसेच ज्या अतिधोकादायक इमारती मागच्या वर्षी खाली करण्यात आल्या होत्या,ज्या राहण्यास अयोग्य आहेत अशा प्रभाग समिती 4 च्या हद्दीतील 4 इमारतींचे पाडकाम आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या आदेशानुसार सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी सुरवात केली आहे.मिनर्व्हा पॅलेस अपार्टमेंट,हिललाईन पोलीस् स्टेशन जवळ,रुपानी महल अपार्टमेंट,प्रभाराम मंदिरासमोर,गंगासागर अपार्टमेंट,सेवक बेकरीसमोर,पवनधाम अपार्टमेंट,कैलास कॉलनी, स्मशान भूमीसमोर ही पाडकाम करण्यात येत असलेल्या अतिधोकादायक इमारतींची नावे असल्याची माहिती सहायक आयुक्त तथा नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *