दारुड्या मुलाच्या आजोबांना आणि वडिलांना

३१ मे पर्यंत पोलीस कोठडी

पुणे : दारुच्या नशेत श्रीमंत बापाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या पॉर्श कारने गेल्या आठवड्यात दोघांना चिरडून ठार मारले. दारुड्या अल्पवयीन मुलाचा हा प्रताप दडपण्यासाठी त्याच्या वडीलांनी विशाल अग्रवालने करोडो रुपयांचा चुराडा केल्याची धक्कादायक माहीती आता पुढे येत आहे. येरवडा पोलिस स्टेशनमधिल पोलिस अधिकारी, ससुन रुग्णालयातील डॉक्टर यांना हाताशी धरून हा अपघात दडपण्यासाठी कोट्यावधी रुपये विशाल अग्रवालने मोजले. बाप कमी की काय म्हणून या अल्पवयीन मुलाच्या आजोबांनी ती अपघातग्रस्त कारवर नोकरीस असणाऱ्या ड्रायव्हरवर गुन्हा कबुलीसाठी दबाव आणला आणि तो एकत नाही म्हणून त्याचे अपहरण त्यांनी केले. या सगळ्या गुन्ह्यासाठी आज न्यायालयाने या विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अल्पवयीन मुलाला न्यायालयाने रिमांड होमला पाठविले आहे.

या प्रकरणात बिल्डरच्या दारूड्या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून खोटा रिपोर्ट दिल्याप्रकरणी ससूनच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर. या दोघांनाही पुणे पोलिसांनी अटक केलीय. या हळनोर यांनी या अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने चक्क कचऱ्यात फेकून देत भलत्याच कुणाचे तरी नमुने तपसून तो दारू प्यायला नसल्याचा खोटा रिपोर्ट दिला होता. दरम्यान या गुन्ह्यात सहभागी ससुनमधिल अजून एक कर्मचारी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

विशाल अग्रवाल याच्या घरावर छापेमारी केल्यानंतर आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल १०० पेक्षा अधिक सीसीटिव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासण्यात करण्यात येत आहे.

वकिलांनी ड्राइवर चा फोन हस्तगत करायचा आहे. ⁠गाडी रिकवर केली आहे. त्याचा पुढचा तपास करायचा आहे. ⁠एकत्रित दोघांच्या प्रकरणाचा तपास करणार आहे. त्यांनी आणखी कोणाची मदत घेतली आहे का? हा तपास करायचा आहे. तसेच ⁠सीसीटीव्ही मध्ये छेडछाड झाली आहे ती कोणी केली? या सर्व बाबींचा तपास करण्यासाठी ७ दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

केवळ बिल्डरच्या सांगण्यावरून आणि पैसे खर्चून ही दडवादडवी करता येणे शक्य नसून यात राजकीय व्यक्तींचा काही सहभाग आहे का यादिशेनेही पोलिस तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *