पालघर : रेल्वे मालघाडी अपघाताच्या दुर्घनटेनंतर २५ तासांनी डहाणुतून पहिली लोकल ट्रेन मुंबईच्या दिशेने रवाना झाली. त्यामुळे, गेल्या दिवसभरापासून लोकल ट्रेनची वाट बघणाऱ्या प्रवाशांचा जीव अखेर भांड्यात पडला.

तुटलेल्या ट्रेनचे ट्रॅक बांधून फायनल टेस्टिंगला उशीर झाल्याने पहिली लोकल ट्रेन उशिराने धावली. मुंबईकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग किंवा रस्ते मार्ग हा अधिक वेळखाऊ असल्याने सर्वांच्याच नजरा लोकल रेल्वेसेवेकडे लागल्या होत्या.

पालघर मालगाडी ट्रेन दुर्घटनेमुळे २४ तासापासून पश्चिम मार्गावरील एका लाईनवरील लोकल ट्रेनसेवा ठप्प झाली आहे. मात्र लांब पल्ल्याच्या ट्रेन सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या, तर काही ट्रेन धीम्या गतीने सुरू होत्या.

रेल्वे विभागाच्या दोनशे ते अडीचशेपेक्षा जास्त मजूर आणि अधिकारी इंजिनियर यांनी यासाठी अवितरतपणे काम केले. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास मालगाडी ट्रेनचे 6 डब्बे रेल्वे रुळावरून खाली घसरले होते. रेल्वेचा या अपघातात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक खांब,पटरी आणि मालगाडी ट्रेनचे नुकसानही झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *