माजी नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण यांच्यातर्फे कार्यक्रम
ठाणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्ताने तारा माऊली संस्थेतर्फे कोपरी येथे आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन करण्यात आले. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लेखिका-निवेदिका साधना जोशी यांचे `यशोदा ते माई सावरकर’ या विषयावरील व्याख्यानही पार पडले. त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती मंगळवारी उत्साहात पार पडली. कोपरीत सावरकरप्रेमींची संख्या लक्षणीय आहे. त्यानिमित्ताने कोपरीतील तारामाऊली सामाजिक सेवा संस्था, आद्यक्रांतिवीर परिवार, स्वराज महिला मंडळ, भारतीय स्त्री जीवन विकास परिषद यांच्या वतीने विविध कार्यक्रम पार पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर कट्टा व स्वा. सावरकर तरण तलाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीरांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात लेखिका साधना योगेश जोशी यांनी ‘यशोदा ते माई सावरकर’ यांचे व्याख्यान झाले. त्यात माई सावरकरांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांची मते उलगडून स्पष्ट करण्यात आली. त्याला सावरकरप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, माजी नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण, उद्योजिका आशाताई कुलकर्णी, प्राचार्य मकरंद घुले, मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वराज्य महिला मंडळाचे संस्थापक मनोहर चव्हाण, मंडळाच्या अध्यक्षा सविता चव्हाण, उपाध्यक्षा मिरा सिनकर, आद्यक्रांतिवीर परिवाराचे हेमंत आळवे, समाजकेवक उदय लेले, भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेच्या पद्यजा काळे, समाजसेवक विलास कोपरकर आदी उपस्थित होते.
