अनिल ठाणेकर

ठाणे : महाड येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी जाहीर मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड हे डाॅक्टर जितेंद्र आव्हाड नसून ते नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत. आज परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असलेले पोस्टर त्यांनी फाडून टाकले. त्यामुळे त्यांच्या मनात परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आले. मतुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात येणार नाहीत ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. पण ज्यांना नाटक करायची सवय आहे. ते आंदोलन करायला महाडला गेले आणि आंदोलन करायच्या भरामध्ये परमपूज्य,  महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे. बाबासाहेब यांच्या अवमानप्रकरणी महाड येथील पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड  त्यांच्याबरोबर फोटोत दिसणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकार्‍यांना अटक करायला हवी अशाप्रकारची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

जितेंद्र आव्हाड हे नाटककार आहेत. त्यांचे खाली डोके वरती पाय अशी स्थिती झालेली आहे. मनुस्मृती जाळायला गेले आणि फाडून आले डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो. स्वतःला पुरोगामी म्हणायचे आणि असे कृत्य करायचे हे शोभनीय नाही. आज त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. यामुळे बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी यावेळी व्यक्त केली.

तत्पूर्वी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयासमोर, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचा निषेध असो, मुर्दाबाद, मुर्दाबाद जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद,  जितेंद्र आव्हाड यांचे करायचे काय, खाली डोक वरती पाय अशाप्रकारच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जितेंद्र आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडविण्यात आले, फोटो फाडण्यात आले व फोटो जाळण्यात येऊन जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ सरचिटणीस प्रभाकर सावंत, सरचिटणीस रविंद्र पालव, महिला अध्यक्षा वनिताताई गोतपागर, युवक अध्यक्ष विरु वाघमारे, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मंगेश सुर्यवंशी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश मेहरोल, विजय देशमुख, मिलिंद डिचवलकर, विधानसभा अध्यक्ष अजय सकपाळ, प्रभाग अध्यक्ष समीर शेख, दिनेश सोनकांबळे, सुपुन मेहरा, उमर शेख, शेहबाज चेऊलकर, विजय धुमाळ आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *