अनिल ठाणेकर
ठाणे : किरण शिखरे यांच्यावर दबाव दडपशाही वापरायची गरजही नाही. जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या कारवाई प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करतो. कळवा मुंब्र्यात २०१४ व २०१९ पेक्षा २०२४ ला सर्वाधिक मतदान झाले आहे. यामुळे आव्हाड यांचा दावा चुकीचा. आव्हाड यांनी एका बापाचे पोस्टर फाडले आणि दुसर्या बापाला अडचणीत आणले. आभाराचे ट्विट करणाऱ्या छगन भुजबळसाहेबांनाच आव्हाड गद्दार म्हणाले होते. सरड्यापेक्षाही रंग बदलणारे आव्हाड आहेत, अशी सणसणीत आरोप माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केले आहेत,
धीरज शर्मा यांच्याबरोबर किरण शिखरे हेएकटे आले होते आणि एकटेच परत गेले आहेत.दिल्या घरी तु सुखी रहा अशा शुभेच्छा देऊन यापेक्षा अधिकचे महत्व त्यांना देण्याची गरज नाही.२ जुलै २०२३ रोजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांनी वेगळा राजकीय निर्णय घेतला त्यांच्याबरोबर तेव्हा मी पहिला जिल्हाध्यक्ष होतो जो २ जुलैलाच देवगिरीवर गेलो होतो आणि ठाण्यातील ९५ टक्के कार्यकर्ते हे अजितदादांबरोबर आले. महाराष्ट्रातील ठाण्याचे आमचे पहिले कार्यालय होते ज्याचे उद्घाटन ९ ऑगस्टला अजितदादांच्या हस्ते झाले होते. आमच्यावर तर कधी कोणी दबाव आणला नाही. जगातल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्या फक्त कळवा मुंब्र्यातच होतात अशाप्रकारचे चित्र भासविण्याची कायम जितेंद्र आव्हाड यांना सवय आहे. यामुळेच आजकाल मी त्यांना रिसर्चचे डाॅक्टर झालेले न म्हणता, नौटंकीकार, नकलाकार, नाटककार असे म्हणतो. लोकसभेचे २० मे ला मतदान झाल्यानंतर असा काही त्यांनी प्रचार केला की कळवा मुंब्राकडे मुद्दामहून मतदानाचा स्पीड कमी करण्यात आला होता. कळवा मुंब्र्यातील मतदानाची आकडेवारी पाहता, २०१४ व २०१९ पेक्षा २०२४ ला सर्वाधिक म्हणजे २ लाख १६ हजार मतदान झाले आहे. मतदानासाठी मुंबई ठाण्यातही रांगा लागल्या होत्या व पिण्याची पाण्याची, पंख्याचा आदी सोईसुविधा जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून केली गेली नसल्याने मतदारांची गैरसोयहो झाली होती, ही वास्तविकता आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी फक्त कळवा मुंब्र्यात कमी झाली हे आव्हाड यांचे म्हणणे आकडेवारीच खोडून काढते आहे. जे जितेंद्र आव्हाड यांनी कृत्य केले, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर येथे फाडले याच्यावर शासनाने कारवाई केलेली आहे, महाड येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांचे मनापासूनआभार व्यक्त करतो मला फासावर लटकवा असा ड्रामा आता त्यांनी केला. माझी त्यांना विनंती आहे की बस्स झाले, चुकून झाले, अनवधानाने झाले हे कुठलेच शब्द त्यांनी वापरणे त्यांनी बंद करावे. अशाच प्रकारचे त्यांनी शिर्डीच्या अधिवेशनात बोलताना भगवान श्रीरामाबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. आणि पक्षाला अडचणीत आणले होते. त्यानंतर धनगर समाजाचे दैवत मल्हाररव होळकर यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. याबद्दल त्यांना धनगर समाजाची माफी मागावी लागली होती. औरंगजेबाने हिंदू देवदेवतांची मंदिरेही तोडली… असे बोलून ते वाक्य कट करुन पुन्हा बाईट दिल्याचे लोकांनी पाहिले. काल मनुस्मृती जाळण्यासाठी आव्हाड महाड येथे गेले होते त्या पोस्टरवर परमपूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होता ते पोस्टर फाडले आणि पायाशी फेकले हे आख्या जगाने बघितले, त्यांच्या एका सहका-याने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला शेवटी कपाळावर हात मारला तरीही त्यांनी व त्यांच्या आजुबाजुच्या सहका-यांनी तरीही पोस्टर फाडले त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. माझी पोलीसांना विनंती आहे की कायदेशीर कारवाई केली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष, वंचित आघाडी, आरपीआय, शिवसेना यांनी आव्हाड यांच्या निंदनीय प्रकाराबद्दल त्यांचा निषेध करत आहेत. सर्वांची मागणी हीच आहे की यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.बाबासाहेब यांचे जे पोस्टर आव्हाड यांनी फाडले ते डिझाईन त्यांच्या कार्यालयात झाले होते, सोशल मिडियाचा कार्याध्यक्ष असलेल्या मोहसिन शेख याने ते डिझाईन केले होते. पोस्टर चे डिझाईन बघितले गेले असेल, कोणी डिझाईन केले,कुठून प्रिंट झाले, कोणाच्या गाडीतून ते त्या स्थानापर्यत नेण्यात आले याची सर्वांची चौकशी करण्यात यावी. भाषणात म्हणायचे परमपूज्य, बोधिसत्व, भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर हा माझा बाप आहे.आणि त्या बापाचेच पोस्टर त्यांनी फाडले, ज्यांना ते आपल्या विचारांचे वारसदार समजतात ते आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब ज्यांना ते बाप संबोधतात त्या बापाला अडचणीत आणले. म्हणजे एका बापाचे पोस्टर फाडले आणि दुसर्या बापाला अडचणीत आणले. राष्ट्रवादीचे जयंत पाटीलसाहेबांनी शेवटी ट्विट करुन त्यांची बाजू मांडून सावरायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब यांनी ही भूमिका मांडली आहै की, याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे, कायदेशीर कारवाई झालेली आहे. मुळ मुद्दा आहे की, मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमात येता कामा नयेत ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे समर्थन करीत नाही, त्याचा विरोधच करीत आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब यांनी देखील स्पष्ट केलेले आहे की, कुठल्याही प्रकारे मनुस्मृतीमधील श्लोक हे पाठ्यक्रमात येणार नाहीत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पण केवळ स्टंट करायचा आव्हाड यांनी प्रयत्न केला आणि यात परमपूज्य बोधीसत्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांनी अवमान केला.टीआरपीसाठी कुठल्या लेव्हलला जावू शकतो हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलेले आहे. ही देखील आठवण करुन देतो की, २८ ऑगस्ट २०२३ रोजी छगन भुजबळसाहेब यांचा आव्हाड यांनी पुतळा जाळला होतात,त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता आणि हे आंदोलन तुमच्या पक्षकार्यालयाबाहेर तुम्ही केले होते आणि या आनंद परांजपे यांनी त्याच जुन्या पक्ष कार्यालयाबाहेर तुमचा पुतळा जाळला होता. त्यामुळे सरडा देखील रंग बदलत नाही त्याच्यापेक्षा जास्त रंग जितेंद्र आव्हाड बदलणारे आपण. ज्या आभाराचे ट्विट छगन भुजबळसाहेबांच्या नावे केले आहे हे तुमचे रंग बदलणे दाखवते, असा थेट आरोप प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला आहे.
