मुंबई : येत्या १ व २ जून रोजी महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर जूनिअर, मास्टर्स I,II,III,IV (इक्यूप्ड) पुरुष व महिला पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद निवडचाचणी स्पर्धा परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

राष्ट्रीय मिल मजदूर संघ, परळ व महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ज्युनिअर गटामध्ये राष्ट्रीय विजेते हर्षदा गोळे, अमृता भगत, सेजल मकवाना, तपस्या मते, सानिका मालसुरे, तर महिला मास्टर्समध्ये डॉ. शर्वरी इनामदार, नीता मेहता, मयानी कांबळे या पुण्याच्या राष्ट्रीय विजेत्या खेळाडू आणि पुरुष मास्टर्समध्ये महेश पाटील, प्रशांत जगताप, जितेंद्र यादव, रवींद्र साळवे, आदिनाथ शेकडे हे राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू सहभागी होणार आहेत.

या राज्य स्पर्धेतून १६ ते २१ जून २०२४ पतियाळा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या प्रवेशिका या इमेलवर maharashtrapowerlifting 2020@gmail.com पाठवाव्यात. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुर्यकांत गर्दे, ९८६९७३६७११, प्रशांत सरदेसाई ९८२०३७०४९७, श्री जितेंद्र यादव ९८१९५९३५९० यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *