पुणे कार अपघात प्रकरण

पुणे : पुण्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाने आपल्या पाॅर्शे  कारने दोघांना चिरडल्यानंतर त्याला निर्दोष ठरवणिसाठी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हाळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे या तीन आरोपींना न्यायालयाने  ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 या प्रकरणी अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि पब चालक, व्यवस्थापक यांना अटक करण्यात आली आहे. तर या अपघाताच्या घटनेमध्ये दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपी
सरकारी पक्षाचे वकिल युक्तिवाद करतेवेळी म्हणाले की, अल्पवयीन आरोपीचे रक्त घेण्यात आले नसून इतर व्यक्तीचे रक्त घेण्यात आले आहे. ज्या व्यक्तीचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले. त्यावेळी सिरींज कचर्‍यामध्ये टाकणे जरुरीचे होते. पण ती सिरींज डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी दुसर्‍या व्यक्तीला दिली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. रक्ताच्या नमुन्याचे रिपोर्ट कोणाच्या सांगण्यावरून बदलण्यात आले? वरील सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी या आरोपींची सात दिवसांकरीता पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी करण्यात आली. त्यावर ५ जूनपर्यंत तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *