भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील भीमनगर येथे माझ्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. या वेळी आव्हाडांच्या छायाचित्राला काळे फासून पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनात माझ्याबरोबरच महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा सौ. स्नेहा पाटील, भाजपाच्या अनुसुचित जाती मोर्चा प्रकोष्टचे अध्यक्ष श्री. वीरसिंग पारछा, श्री. बाळा केंद्रे, भाजयुमोचे शहराध्यक्ष श्री. सुरज दळवी, मंडल अध्यक्ष श्री. संतोष जायसवाल, श्री. निलेश पाटील, श्री. राम ठाकूर, श्री. जितेंद्र मढवी, श्री. आनंद बनकर, सौ. नताशा सोनकर, श्री. सुभाष साबळे, श्री. अक्षय तिवरामकर आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.