1 जून ते 3 जूनर्यंत राज्यात जोरदार पाऊस
मुंबई : मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यानंतर आता महाराष्ट्रात 1 जून ते 3 जूनर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे आज एक दिवस आधीच 30 मे रोजी मान्सूनकेरळमध्ये दाखल झाला आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात काय स्थिती असणार याबाबतची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात, शनिवार दिनांक 1 जून ते सोमवार 3 जूनर्यंत वारा-वावधानासह गडगडाटी वळीव पावसाची शक्यता जाणवते.
पुढील 2 दिवसात मात्र उष्णतेत अजुन वाढ होण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात मात्र आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे एक जूनपर्यन्त, सध्या चालु असलेल्या ढगाळयुक्त दमटयुक्त उष्णतेचे वातावरण कायम असेल. मुंबईसह कोकणातील उष्णता कायम राहणार