विशेष

सलमान पठाण

‘पोस्टमन’… सोशल मीडिया यायच्या आधी ही व्यक्ति आपल्या आयुष्यात खूप महत्वाची होती. सकाळी मनी ऑर्डर घेऊन आला की पैसे आल्याचा आनंद आणि एखादी तार घेऊन आला की काळजाचा ठोका चुकायचा… गावाकडच्या नातेवाईकांना पैसे वाटणारा आणि हो निधनाच्या बातम्या देणारा हा पोस्टमन आपल्या आयुष्याचा भाग बनला होता. सुखदुःखातील साथी…जणूमानवी भावभावनांचा दूतच !

आपल्या लोकांबद्दल माहिती मिळण्यासाठी पत्र आणि त्यामुळे पोस्टमनची आपण नेहमीच वाट पहायचो. पण आता सोशल मीडियामुळे यांचं महत्व कमी होत गेलं. मनी ऑर्डरची जागा गुगल पे ने घेतलीय तर व्हाॅट्सअपमुळे पोस्टाची तार निकालात निघालीय.
असो तर सोशल मीडियाच्या आधी माणसांच्या भावना जणू पत्रांच्या रूपात, टेलिग्रामच्या रूपात पोस्टमन प्रत्येकापर्यंत पोहोचवत असे. अश्याच एक पोस्टमनची ही कहाणी, भारत लक्ष्मण महाडीक.
नांदगाव हे रायगड विभागातील अगदी जेमतेम एक हजार लोकसंख्या असलेले कोकणच्या हिरव्यागार कुशीत वसलेले गाव आणि त्या गावात आपल्या बालपणी राहणारे भारत लक्ष्मण महाडिक..
गावात थोडीफार जमीन आणि त्यात चार भावंड आणि सर्वात छोटे हेच घरात लाईट नाही दिव्याखाली अभ्यास करून कसबस आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं पुढे छोटे हायस्कूलमधून मोठ्या हायस्कूलमध्ये गेल्यानंतर पुस्तक घेण्याची ऐपत सुद्धा नव्हती आणि घरची परिस्थिती हालाखीची होती त्यामुळे शिक्षण इथेच थांबावं लागलं. वडिलांना दारूचे व्यसन आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती वाईट असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणे खूप मुश्किल होते
त्यामळे भारत महाडिक हे चुलत्याबरोबर मुंबईला आले.
मुंबईला तर आले खरे पण इथे आल्यानंतर लगेचच नोकऱ्या मिळत नाही पुढे मुंबईत आल्यानंतर नाईट हायस्कूलला शिकण्याचा ही प्रयत्न केला पण आर्थिक परिस्थिती साथ देत नव्हती त्यामुळे काही जमले नाही त्यामुळे सर्वप्रथम त्यांनी हॉटेलमध्ये वेटरच काम केलं हॉटेलमध्येच काम करत असताना ही ओळखीमुळे साकीनाका येथील खुराणा अँड कंपनी मध्ये काम मिळालं राहायला घाटकोपर ला होतो आणि काम साकीनाका मध्ये मिळालं होत. या मध्ये पेप्सी बनवण्याच काम होत काम अंगावर होत जितके जास्त पीस बनवू तितका जास्त पगार मिळत असे आणि मग नंतर तोच माल अगदी दादर परळ पर्यंत कारखान्यात घेऊन जावा लागत असे काम खूप मेहनतीचं आणि कष्टाचं होतं मोठ्या भावाचं लग्न झाल्यानंतर तो वेगळा राहायला गेला त्यामुळे घराची जबाबदारी यांच्यावरच होती अधून मधून गावी जात होते आणि सग्या सोयऱ्याच्या हाताने काही मदत पाठवत असे आणि अशातच त्यांची ओळख त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एका मुलीशी झाली आणि हळूहळू त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झालं असं म्हणतात ना मित्रासाठी काय पण तसंच या मैत्रिणीने आपल्या मित्रासाठी खूप मदत केली त्यांची मैत्रिण ही पोस्ट ऑफिस मध्ये कामावर होती त्या मुळे तिने त्यांना सल्ला दिला की तुम्ही एम्पल्यामेंट कार्ड बनवून घ्या
आगोदर हे कार्ड असेल तरच कमवर घेत असे हे कार्ड बनवल्यानंतर त्यांना पुढे कामासाठी एक कॉल आला आऊटसाईड साठी काम होतं म्हणजे पोस्ट ऑफिसमध्ये जे शासकीय परमनंट कर्मचारी गैरहजर असतील त्यांच्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपात काम होत 1986 च्या काळात कामाचा पगार दिवसाला फक्त सतरा रुपये इतका होता आणि काम हे दादर येथील भवानी शंकर पोस्ट ऑफिस मध्ये होते राहायला काका सोबत घाटकोपर ला होते काका पण एकटेच होते त्यामळे मित्र आणि काका अशे सगळे मिळून 4 जन सोबत राहत असे जेवणापसून ते धुणी भांडी पर्यंत सगळ काम हे त्यांनाच करावं लागतं असे
पुढे 1988-90 च्या काळात पोस्ट ऑफिस मध्ये भरती सुरू झाली आणि त्यासाठी पात्रता ही परीक्षा पास होण्याची अट होती आणि त्यामध्ये पण जे पहिल्यापासून इथे दिवसाच्या हजेरीवर काम करणारे होते त्यांच्यासाठी 50% जागा ठेवल्या होत्या आणि ज्याचे वर्षाचे 240 दिवस भरले आहे त्यांनाच ही संधी उपलब्ध होती यात 3 प्रकारची परीक्षा होती हिंदी इंग्लिश आणि गणिताचे पेपर होते जो ही परीक्षा पास होईल त्यांनाच परमनंट म्हणून कामावर घेणार होते दादरच्या राजे शिवाजी केंद्रावर ही परीक्षा होती परीक्षा पूर्वीच्या मॅट्रिक परीक्षा इतकी अवघड होती आणि या परीक्षेत पास होईल असे त्यांना वाटत नव्हतं म्हणून त्या सर्व कामगारांनी मिळून परीक्षा केंद्रावर जाऊन ही परीक्षा उधळून लावण्यात त्यांच्या संघटनेला यश आलं या मध्ये जुन्या सहकऱ्याच योगदान लाभलं.
यानंतर महाराष्ट्राचे पीएमजी साहेब यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटीसाठी आमंत्रित केलं आणि चर्चा आणि त्यांचा निर्णय झाला की तुम्ही योग्य त्या प्रकारे परीक्षा द्यावी आणि जे जे परीक्षार्थी पास होतील त्यांना कामावर पर्मनंट करून घेण्याची जबाबदारी माझी असं त्यांनी आश्वासन दिल
पुढे परीक्षा झाली आणि काही दिवसातच परीक्षेचा निकाल लागला आणि एक ऑगस्ट 1991 रोजी यांच्या आयुष्याला नवीन सुरुवात झाली या दिवशी त्यांचे पोस्टमन या पदावर परमनंट म्हणून सेवा सुरू झाली त्यांना मदत करणारी मैत्रीण ही याच दिवशी नोकरीमध्ये परमनंट म्हणून नियुक्त झाली आणि पुढे हळूहळू त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी दोघांनी मिळून आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
पण मात्र घरच्यांचा विरोध होता त्यांनी विरोधाला न जुमानता बांद्रा येथील कोर्टात जाऊन अगोदर कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर घरातील सर्वांच्या संमतीने सहमती मिळवून हिंदू रितीरिवाजाप्रमाणे वर्षाच्या सरते शेवटी 18 डिसेंबर 1992 रोजी लग्नगाठ बांधली.
पुढे लग्न झाल्यानंतर एका वर्षाच्या आत मध्ये त्यांना लक्ष्मीच्या रूपाने मुलगी झाली आणि त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराटीला आली ही मुलगी जणू साक्षात लक्ष्मीचे रूप होते ही मुलगी आल्यानंतर त्यांच्या घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी नांदू लागली पुढे 2 वर्षा नंतर त्यांनी प्रयत्न केला आणि दुसरीही मुलगीच झाली दुसरी मुलगी झाली म्हणून नाराज न होता आयुष्यात जे काय होतं ते चांगल्यासाठीच होतं अशी नवरा आणि बायकोची समज होती आणि ती साक्षात त्यांनी आयुष्यात उतरवली आमच्या मुलींना आम्ही मुलाप्रमाणेच सांभाळून मुलाप्रमाणे शिक्षण देऊ आणि त्यांचं आयुष्यामध्ये योग्य ते प्रकारे त्यांना सेटल करू असा दृढ निश्चय दोघांनीही केला बघता बघता काही काळ गेला आणि त्यांच्या पहिल्या मुलींना त्यांनी घाटकोपर येथील पुणे विद्या भवन या नामांकित शाळेमध्ये प्रवेश दिला मुलगी ही पहिलीपासूनच खूप हुशार आणि अगदी चाणक्य बुद्धी होती मुलीलाही शिक्षणाची खूप आवड आणि वडिलांची हालाखीची परिस्थिती बघून आयुष्यात आपण काहीतरी करावे असे नेहमी त्यांच्या मुलींना वाटत असेल मोठ्या मुलीप्रमाणे लहान मुलीचाही पुणे विद्या भवन यांना शाळेमध्ये प्रवेश झाला त्या मुलीने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि भारतात राहून युके मधील अकाऊंट ची डिग्री मिळवली आणि पुढे कोटक महिंद्रा या बँकेमध्ये तिची नियुक्ती झाली आणि आज याच बँकेमध्ये ती एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहे..
मोठ्या बहिणीचं यश बघून छोटा ही बहिणींना यश मिळवण्यामध्ये काही कसर सोडले नाही दहावीत असताना तिने 92 टक्के मिळून शाळेमधून प्रथम क्रमांक पटकावला आणि पुढे बांद्रा येथील पॉलिटेक्निकल कॉलेजला बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केला त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर व्हावं अशी तिची इच्छा होती आणि पुढे घाटकोपर येथील के जे सोमय्या कॉलेजमध्ये तिचा ऍडमिशन झालं आणि पुढे तीन वर्षानंतर या कोर्समध्ये उत्तम प्रकारे पास होऊन तिने पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्क मधील एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवली नोकरी करत असताना तिच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग आला की तिला आपल्याच कंपनीकडून परदेशात काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती आई वडिलांच्या सहमतीने जाण्यास होकार दिला कंपनीत काम करत असताना तिची ओळख एका मुलाबरोबर झाली आणि तोही मुलगा परदेशात कामासाठी कंपनीकडून जाणार होता दोघांनीही घरच्यांच्या सहमतीने विवाहाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आणि लग्न झाल्यानंतर दोघेही ऑस्ट्रेलियाला कंपनीकडून रवाना झाले कंपनीकडून समाधानकारक पगार मिळत नव्हता म्हणून त्यांनी ऑस्ट्रेलिया मधील नामांकित कंपनीमध्ये परीक्षा देऊन तिथे चांगल्या दर्जाची नोकरी मिळवली मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये त्यांना त्या देशाचे नागरिकत्व मिळालेला आहे आणि आज सध्या ऑस्ट्रेलियामध्ये ते दोघेही एकाच कंपनीत उच्च पदावर असून त्यांनी स्वतःच्या मालकीच परदेशात घर खरिदी केलेलं आहे आणि सुखाने गुण गोविंदाने ते आपला संसार करत आहे…
‘म्हारी छोरी किसी छोरो से कम है क्या’ असं म्हणतात ना हेच या मुलीने सत्यात उतरवून दाखविले आहे. दोन्ही मुलीचे हे उत्तुंग भरारी घेणारे यश पाहून कुठेतरी आई-वडिलांचे मन गहिवरून जाते. वयाची 33 वर्ष पोस्ट ऑफिस मध्ये काम करून त्यांनी आपल्या मुलींना मुलाप्रमाणे सांभाळ करून योग्य ती शिक्षा देऊन त्यांना इतकं मोठ करण्यामागे भरत लक्ष्मण महाडिक आणि त्यांची अर्धांगिनी भारती महाडिक यांचा मोलाचा वाटा आहे. आज प्रत्येक व्यक्तीने यांच्या या विचाराचा आदर्श घ्यायला हवा . मुलगा मुलगी मध्ये भेदभाव न करता त्यांना योग्य त्या प्रकारे शिक्षण द्यायला हवे. 31 मे 2024 रोजी हे भरत महाडिक पोस्ट खात्यातून सेवा निवृत्त होत आहे अश्या या महान व्यक्तीच्या कर्तुत्वाला लाल सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *