आरुष कोल्हेचे नाबाद  द्विशतक; तेंडुलकर संघाला विजेतेपद

मुंबई :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकर संघाने विजेतेपदाचा मान मिळविला. कालचा नाबाद शतकवीर आरुष कोल्हेने आज नाबाद द्विशतकी खेळी केली. २९२ चेंडूत त्याने ३७ चौकारांसह नाबाद २०८ धावा केल्या. दर्शन राठोड च्या साथीने त्याने आठव्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी केल्याने वेंगसरकर संघाने ८ बाद ३७९ या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला. या स्पर्धेत  अंतिम साखळी लढतीपूर्वी सर्वाधिक सहा गुण असणाऱ्या तेंडुलकर संघाने मग खेळ संपेपर्यंत ६६ षटकांत ५ बाद १६० धावांपर्यंत मजल मारल्याने पहिला डाव अपूर्ण राहिल्याने उभय संघाना प्रत्येकी एक-एक गुण मिळाला आणि ७ गुणांसह तेंडुलकर संघाला विजेतेपद मिळाले.

कर्नाटक स्पोर्टींग येथील दुसऱ्या लढतीत काळ रवी शास्त्री संघाला २०९ धावांत गुंडाळणाऱ्या गावस्कर संघाने १०१ षटके फलंदाजी करीत सर्वबाद ३३२ धावा करून पहिल्या डावातील आघाडीचे तीन गुण वसूल करीत संपली गुणसंख्या ६ वर नेली. त्यांच्या अगस्त्य काशीकर  (१०४) याने आज शतकी खेळी केली, तर धैर्य पाटील (४७), हर्षित बोबडे (४६) यांनी देखील आपला खारीचा वाटा उचलला.

स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून आरुष कोल्हे (४१३ धावा) याला गौरविण्यात आले, तर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी त्याला क्रिकेट बॅट देत त्याचा विशेष गौरव केला. सर्वोत्तम गोलंदाज म्हमून मोक्ष निकम (११ बळी) याची निवड करण्यात आली तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून आरुष कोल्हे याचीच निवड करण्यात आली. भारताचा कसोटीवीर शार्दूल ठाकूर, वेंगसरकर, मुंबई क्रिकेट अससोशिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : कर्नाटक स्पोर्टींग – रवी शास्त्री संघ – ४६.४ षटकांत सर्वबाद २०९  आणि बिनबाद ५ धावा  वि. गावस्कर संघ –  ३२ षटकांत २ बाद १०३  (वेदांग मिश्रा २४, देवाशिष घोडके ४२, अगस्त्य काशीकर १०४ , धैर्य पाटील ४७; वेदांत कडू ५७/३, शाहिद खान ३१/२, युवराज भिंगरे ४३/२, करीन केळुस्कर ४८/२) )

ओव्हल मैदान – वेंगसरकर संघ – १०४  षटकांत ८ बाद ३७९ डाव घोषित  (रोशन फारुकी २२, अरहाम जैन १८, आरुष कोल्हे  नाबाद २०८, उज्ज्वल सिंग १५, दर्शन राठोड 48; अनुज सिंग  ३५ धावांत २ बळी ,  मोक्ष निकम  ७०  धावांत ३ बळी, आर्यन कुमार ४८ धावांत २ बळी) वि. तेंडुलकर संघ ६६ षटकांत ५ बाद १६० (सैफ अली ३७, हर्ष कदम ६७, श्रेयस खिलारे २४)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *