Month: May 2024

निवडणुकीचा निकाल ब्रम्हदेवालाही सांगता येणार नाही – अजित पवार

मुंबई : 5 वर्षे कितीही काही काम केले, तरी फार लक्षात ठेवलं जातं असं नाही. भारतासारखी अल्प स्मरणशक्ती जगात कुठेही पाहायला मिळत नाही.. हे सत्य आहे. निवडणुकीच्या तीन ते चार महिन्यातील घडामोडींव निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो. आणि…

केजरीवालांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

अंतरिम जामिनाची मुदत वाढवण्याच्या याचिकेवर तातडीच्या सुनावणीला नकार नवी दिल्ली : निवडणूकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामिनावर असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायायलाने दणाक दिला आहे. दिल्ली कथित मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी…

रविवारची सुट्टी ख्रिश्चनांमुळे, शुक्रवारची सुट्टी मुसलमानांमुळे!

झारखंड सरकारच्या निर्णयावर मोदींचा घणाघात झारखंड : आपल्या देशात इंग्रजांचे राज्य होते, म्हणून ख्रिश्चनांसाठी रविवारी सुट्टी असते. रविवारचा हिंदूंशी काहीही संबंध नाही. तो ख्रिश्चन समाजाशी संबंधित आहे. हे दोनशे ते तीनशे वर्षांपासून सुरू आहे. मात्र आता, झारखंड…

पुणे अपघात दडपण्यासाठी कोट्यावधींचा चुराडा !

 दारुड्या मुलाच्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी पुणे : दारुच्या नशेत श्रीमंत बापाच्या अल्पवयीन मुलाने आपल्या पॉर्श कारने गेल्या आठवड्यात दोघांना चिरडून ठार मारले. दारुड्या अल्पवयीन मुलाचा…

मनसेनंतर अजित पवरांचाही एकला चलो रे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषेदसाठी मुंबै बँकेच्या नलावडेंना उमेदवारी स्वाती घोसाळकर मुंबई : अवघ्या देशासहीत महाराष्ट्रही येत्या चार जूनच्या लोकसभा निकालाकडे डोळे लावून बसला आहे. या निकालानंतर राज्यातही त्याचे पडसाद उमटणार आहेत. त्यादृष्टीने…

निसटत्या आघाडीने तेंडुलकर संघाचे ६ गुण

ड्रीम इलेव्हन कप (१४ वर्षाखालील) निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा मान सिंघवीला शतकाची हुलकावणी मुंबई, २८ मे :  मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या ड्रीम ११ कप या १४ वर्षाखालील मुलांच्या…

वस्ताद वसंतराव पाटील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

मुंबई : कुस्ती क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल “पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य* यांच्यावतीने” पैलवान सुभाषदादा पाटील सर युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ” यांच्यावतीने भाईंदर येथील  श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद वसंतराव…

मोरेकर गणित अभ्यासिकेचा शंभर टक्के निकाल

ठाणे : सेवारत्न पुरस्कार विजेते हरेश्वर मोतीराम मोरेकर संचलित मोरेकर विनाशुल्क गणित अभ्यासिकेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ४ मुले आणि ५ मुलींचा समावेश होता. या…

उल्हासनगर महापालिकेच्या रुग्णालयातील सुरक्षारक्षकाची आत्महत्या

सहा महिन्यापासून पगार दिला नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उल्हासनगर महापालिकेच्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने गेल्या ६ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. या घटनेने उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेचे म्हारळ गावाच्या वेशीवर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे राजू धाटावकर यांना गेल्या ६ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने लोनचे हप्ते भरू न शकल्याने सोमवारी दुपारी  3 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने शहरात संतापाचे वातावरण पसरले आहे. सदर  हॉस्पिटल हे मनपा प्रशासनाने खाजगी तत्वावर दिले असून येथील कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार दिला जातो व 12 – 12 तास काम करवून देखील वेळेवर पगार दिला जात नसल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पालघर रेल्वे स्थानकात मालगाडी घसरली

मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प पालघर : स्टीलच्या कॉइल वाहून मुंबईकडे जाणारी मालगाडी पालघर रेल्वे स्थानकाच्या लगत घसरल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. स्टील कॉइल वाहून नेणारी मालगाडी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात प्रवेश करताना या मालगाडीचे गार्डच्या डब्यासह अखेरचे सहा डबे घसरले. त्या बरोबरीने या मालगाडीच्या डब्यावर असणाऱ्या अवजड कॉईल लगतच्या लूप लाईन (स्लाइडिंग ट्रॅक) वर पसरल्याने पालघर रेल्वे स्थानकात असणारे रेल्वे लाईन क्रमांक दोन, तीन व चार वरील सेवा खंडित झाली आहे. त्याच बरोबरीने अप दिशेच्या विद्युत वाहिनी नादुरुस्त झाली असून पुढील किमान चार ते पाच तास या मार्गावरील वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईकडून गुजरात दिशेने जाणारी वाहतूक सुरु असून धीम्या गतीने या मार्गावरून गाड्या सोडल्या जात आहेत. तरीदेखील दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर या वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे.