Month: May 2024

ठाणे लोकसभा मतदारसंघातील नाविन्यपूर्ण मतदार केंद्रे

ठाणे : ठाणे जिल्ह्यात २० मे रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदानासाठी २५- ठाणे लोकसभा मतदारसंघाची मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. जास्तीत जास्त  नागरिकांनी मतदान करावे असे  आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. २५ ठाणे लोकसभा मतदारसंघात सखी, दिव्यांग आणि युवा ही नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत सखी मतदान केंद्रे : १४५ मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ४३६ (रॉयल कॉलेज), १४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र.४३९ (श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, पोखरण रोड नं. २ तळमजला), १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९९ (नेपच्यून एलिमेंट आयटी पार्क, ओपन स्पेस पार्टीशन १ रोड नं. २२ वागळे इस्टेट, ठाणे), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २६५ (एनकेटी महाविद्यालय, खारकर आळी, तळमजला सभागृह ठाणे), ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १५२ (सरस्वती हायस्कूल, तळमजला, सेक्टर ५, ऐरोली), बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र.१२४ (सेव्हनडे ॲडव्हेटेन्ज हायर सेकंडरी स्कूल,सेक्टर 8 सानपाडा) येथे सखी मतदान केंद्रे असणार आहेत. दिव्यांग मतदान केंद्रे- १४५ मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९१ (बिशॉप इंटरनॅशनल स्कूल), ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३२६ (टीएमसी जिद्द शाळा, तळमजला वसंतविहार, ठाणे )  कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३०६ (विठ्ठल रुक्मिणी सेवा संघ, कमल तलावासमोर, पार्टीशन नं २ गांधी नगर रोड, गांधीनगर ठाणे ), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २८३ (सरस्वती एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, तळमजला, पाचपाखाडी), १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १४१ (दत्ता मेघे वर्ल्ड ॲकॅडमी ग्राऊंड फ्लोअर, ऐरोली सेक्टर 16),  बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २०५ (स्किल ॲण्ड ॲबॅलीटी बॉईज स्कूल, सेकटर ११ प्लॉट नं. ९ नेरुल नवी मुंबई) येथे ती असणार आहेत. युवा मतदान केंद्रे  – मीराभाईंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १९६ (भाईंदर सेकंडरी स्कूल, तळमजला रुम नं १), ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३३२ (शिवाई विद्यालय, शिवाई नगर, ठाणे) कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १७० (ठाणे मॅन्युफॅक्चर असोसिएशन, जे.के. ऑडीटोरीयम हॉल, वागळे इस्टेट ठाणे), ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. ३५३ (विद्याप्रसारक मंडळ कॉमर्स ॲन्ड आर्टस कॉलेज, बि नं ३, बांदोडकर कॉलेज ऑफ कॉमर्स, ठाणे ), ऐरोली विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. १६९ (जमनाबाई जनार्दन माधवी नवी मुंबई महापालिका शाळा क्र 48 तळमजला, सेक्टर ७ दिवा गांव ऐरोली), बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्र. २८ (कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी) येथे तयार करण्यातआली आहेत.

एसटीपी ठेकेदाराकडुन रस्ते पूर्ववत करण्यास शर्थीचे प्रयत्न सुरू !

पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी माथेरान : दरवर्षी माथेरान मध्ये अडीचशे ते तीनशे इंच पावसाची नोंद होते. अतिवृष्टीमुळे नेहमीच रस्त्यावर पावसाळी पाणी वाहून जात असल्याने रस्त्यांची वाताहत होते यासाठी सनियंत्रण समितीच्या परवानगीने माथेरान या अतिसंवेदनशील क्षेत्रात रस्त्याची धूप थांबविण्यासाठी क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार गावातील अनेक ठिकाणी सुरुवातीला पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते त्यानंतर दस्तुरी ते पांडे रोड पर्यंतच्या मुख्य मार्गावर धुळीमुळे व्यापारी वर्गाचे दुकानातील सामानाचे मोठया प्रमाणात नुकसान व्हायचे यासाठी हा मुख्य रस्ता धूळविरहित करण्यासाठी एमएमआरडीए च्या माध्यमातून काम सुरू केले होते परंतु अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर या कामावरसुध्दा नेहमीप्रमाणे आक्षेप घेण्यात आल्यामुळे हे महत्वपूर्ण काम अर्धवट स्थितीत आहे. नुकताच सांडपाणी प्रक्रिया कामी रस्त्यांची खोदाई करून मलनिस्सारण पाईप लाईन टाकण्यात आली आहे.हे रस्ते खोदताना जे काढलेले पेव्हर ब्लॉक होते ते पुन्हा लावू नये असा पवित्रा  विकासाला विरोध करणाऱ्या गावातील काही मंडळींनी घेतला होता.त्यामुळे जर का ह्या खोदलेल्या रस्त्यांवर काढण्यात आलेले पेव्हर ब्लॉक लावले नसते तर आगामी काळात अतिवृष्टीमुळे लोकांच्या घराघरात पावसाळी पाणी जाऊन वित्तहानी झाली असती याकामी गावातील अन्य काही अभ्यासू,गावाचे हित पाहणाऱ्या लोकांच्या आग्रहास्तव हे रस्ते अबाधित राहण्यासाठी, गावाची सुंदरता टिकून रहावी धुळीचे साम्राज्य पसरू नये यासाठी संबंधीत ठेकेदाराला सूचित केल्यावर रस्ते पूर्ववत करण्यात येत आहेत. सनियंत्रण समितीने मुख्य रस्त्यावरील नवीन क्ले पेव्हर ब्लॉकचा विषय न्यायालयात प्रविष्ट असल्याने ब्लॉकचे नवीन काम बंद केले आहे. काही राजकीय पक्षांची मंडळी येथील काही भोळ्या भाबड्या लोकांना हाताशी धरून आतापर्यंत जी जी विकासकामे झाली आहेत त्यास केवळ आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी विकासाला विरोध करत आहेत. परंतु राजकारण बाजूला ठेवून एक सामाजिक बांधिलकी म्हणून शासनाच्या वतीने येणाऱ्या विकासकामांला नाहक विरोध करून सर्वसामान्य लोकांचे आणि भावी पिढीला अधोगतीला नेण्यास कारणीभूत ठरत आहेत. जर इथल्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना या गावात पर्यटन क्रांती घडवायची असेल तर विकास कामांना सहकार्य करणे ही काळाची गरज आहे. श्रेयवादामुळे आर्थिक लाभासाठी झटणारी काही मंडळीना गावाबद्दल काहीही सहानुभूती नसून आपला स्वार्थ कसा साधता येईल याकडेच त्यांचा नेहमीच दृष्टिकोन राहिला आहे. असे सूर सर्वत्र स्थानिकांमधून  ऐकावयास मिळत आहेत. ——————————————————- क्ले पेव्हर ब्लॉक ही माथेरानचे रस्ते बनविण्याकरिता काळाची गरज आहे. दर वर्षी माथेरान मध्ये जास्त पाऊस होत असल्यामुळे रस्ते वाहून जात होते याचा विचार करून मॉनेटरिंग कमिटीने क्ले पेव्हर ब्लॉक बसविण्याचा निर्णय घेतला. परंतु अर्धा रस्ता झाल्यानंतर या ब्लॉकला विरोध होतोय. दगड मातीचे रस्ते बनविन्याकरिता मोठया प्रमाणात दरवर्षी दगड माती उपलब्ध  होत नसल्याने भविष्यात  माथेरानचे संपूर्ण रस्ते बनविण्याकरिता क्ले पेव्हर ब्लॉक शिवाय पर्याय उरलेला नाही. वसंत कदम—-अध्यक्ष शिवगर्जना मित्र मंडळ माथेरान

वर्तकनगर रहिवाशांचा मतदान बहिष्कार निर्णय मागे !

प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर अनिल ठाणेकर ठाणे : पुनर्विकास रखडल्याने वर्तकनगर येथील रहिवाशांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने आता या रहिवाशांनी  मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नं. १२ इमारतीचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडलेला आहे. पाठपुरावा करूनही विकासक दाद देत नव्हता. अखेर येथील ३२ कुटुंबांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले होते. स्थानिक लोकप्रतिनिधी राजू फाटक यांनी विनंती करत बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांची भेट करून दिली. आमदार प्रताप सरनाईक यांनी रहिवाशांच्या बैठकीत विकासकाला फोन केला. विकासकाने येत्या ८ दिवसात रहिवाशांशी चर्चा करतो असे आश्वासन आमदार प्रताप सरनाईक यांना दिले. यानंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी या रहिवाशांना लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर रहिवाशांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या शब्दाला मान देऊन मतदान बहिष्कार निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.

मतदान साहित्य पोहोचले मतदान केंद्रांवर !

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील भिवंडी, कल्याण,  ठाणे या तीनही लोकसभा मतदारसंघातील कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्राधर पोहचले आहेत. मतदान साहित्य वाटप आणि ते मतदान केंद्रांवर घेऊन जाणे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्तम असे नियोजन केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना* बजावता येणार मतदानाचा हक्क – अशोक शिनगारे

अनिल ठाणेकर ठाणे जिल्ह्यातील २३ भिवंडी, २४ कल्याण व २५ ठाणे या लोकसभा मतदारसंघात एकूण सुमारे ६६ लाख ७८ हजार ४७६ मतदारांना २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी जिल्ह्यात तीनही लोकसभा मतदारसंघ मिळून एकूण ६६०४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.  या मतदान केंद्रामध्ये साहित्य पोचविण्याचे काम करण्यात आले आहे. नागरिकांनीही मतदार यादीत नाव तपासून आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यात भिवंडी, कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय व विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या पुढील प्रमाणे भिवंडी लोकसभा मतदारसंघ   – एकूण मतदार – २०८७६०४ (पुरुष मतदार-११२९७१४, महिला मतदार- ९५७१९१, तृतीय पंथी मतदार-३३९, सेवा मतदार-३६०). भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 324046 (पुरुष मतदार-168329, महिला मतदार-155638, तृतीय पंथी मतदार-11, सेवा मतदार-68). शहापूर विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 279176 (पुरुष मतदार-143402, महिला मतदार-135735, तृतीय पंथी मतदार- 0, सेवा मतदार-39). भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 304975 (पुरुष मतदार-176499, महिला मतदार-128338, तृतीय पंथी मतदार- 122, सेवा मतदार-16) भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 336124 (पुरुष मतदार-198044, महिला मतदार-137887, तृतीय पंथी मतदार- 179, सेवा मतदार-14) कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 400278 (पुरुष मतदार-212612, महिला मतदार-187514, तृतीय पंथी मतदार- 12, सेवा मतदार-140). मुरबाड विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 443005 (पुरुष मतदार-230828, महिला मतदार-212079, तृतीय पंथी मतदार- 15, सेवा मतदार-83). कल्याण लोकसभा मतदारसंघ एकूण मतदार – 2082800 (पुरुष मतदार-1117414, महिला मतदार-964021, तृतीय पंथी मतदार-786, सेवा मतदार-579). अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ एकूण मतदार – 353661 (पुरुष मतदार-189844, महिला मतदार-163654, तृतीय पंथी मतदार- 56, सेवा मतदार-107).…

‘वोट जिहाद’ला ‘वोट यज्ञ’ने चोख उत्तर देणार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भिवंडीत इशारा भिवंडी : लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मते मिळत नसल्याचे पाहून नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून `वोट जिहाद’ घडविले जात आहे. त्याला `वोट यज्ञ’ने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त `वोट’ एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्ये `समिधा’ म्हणून टाकेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. एका धर्माची मते मिळवून आपण जिंकू, असे ज्यांना वाटत असेल, त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले. भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजुरफाटा येथे आज जाहीर सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अनुसुचित क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष व श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, भाजपाचे आमदार महेश चौघुले, निरंजन डावखरे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, कर्नाटकचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुभाष माने, मनोज काटेकर, भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, मनसेचे मनोज गुळवी आदींसह महायुतीचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी मतदान करा, असे कोणी सांगत असेल, त्यांना `जो मोदी का नही, वो हमारे काम का नही’, असे उत्तर द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच महाभारतातील लढाईचा संदर्भ देत इंडी आघाडीत राहुल गांधी, उद्धव ठाकरे असे कौरव जमा झाले असून, या लढाईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील पांडवांकडून शस्त्राने नव्हे तर `वोट’ ने उत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. यंदाची निवडणूक ही जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुन्हा निवडीची आहे, असे श्री. फडणवीस यांनी नमूद केले भिवंडी शहराचा २०१४ पासून महायुतीचे उमेदवार कपिल पाटील व भाजपाचे आमदार महेश चौघुले यांच्याकडून विकास केला जात आहे. एकेकाळी भिवंडी हा अप्रगत भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र, येथील नागरिकांनी भाजपाला मत दिल्यामुळे भिवंडी शहराचा चेहरामोहरा बदलला, असे प्रतिपादन श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्यामा-श्याम सत्संग समितीचा भिवंडीत कपिल पाटील यांना पाठिंबा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये भिवंडीतील अग्रगण्य श्यामा-श्याम सत्संग समितीने महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच गेल्या दहा वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या कार्याबद्दल आनंद व्यक्त करून मला पाठिंबा दिला. या वेळी समितीचे अध्यक्ष श्यामबाबू गुप्ता, उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, महासचिव सत्यनारायण लोहिया, सचिव प्रशांत धुमाळ, खजिनदार भरत शहा यांच्यासह समितीचे सत्संगी उपस्थित होते. चौकट फडणवीसांच्या ११५ व्या सभेने भिवंडीत प्रचाराचा समारोप देशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत देशभरासह महाराष्ट्रात ११५ सभा घेतल्या. भिवंडीतील उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारावेळी झालेल्या सभेत श्री. फडणवीस यांनी ही माहिती दिली. तसेच राज्यात महायुतीचा विजय होणार असल्याची ग्वाही दिली.

भिवंडीतील मतदान केंद्रावर होणार आगरी कोळी संस्कृतीचे दर्शन

महिला, युवा, दिव्यांग या नाविन्यपूर्ण मतदान केंद्रावर होणार मतदान – अशोक शिनगारे अनिल ठाणेकर ठाणे: २० मे रोजी होत असलेल्या लोकसभा २०२४ निवडणुकांसाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून विविध शासकीय आस्थापनांचे अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी मेहनत घेत असून महिला, युवा व दिव्यांग मतदान केंद्र एकसारखी असावीत यासाठी नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येकी १ या प्रमाणे १८ केंद्रे सखी मतदान केंद्रे, १८ युवा मतदान केंद्रे, १७ दिव्यांग केंद्रे व काही मतदान केंद्रे हे आगरी –कोळी संस्कृतीचे दर्शन घडविणारी करण्यात येणार आहे. महिला मतदान केंद्रावर संपूर्ण पथक हे  महिलांचे असणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष,तीन मतदान अधिकारी, शिपाई म्हणून महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी थीम गुलाबी रंग ठरविण्यात आली आहे. यामध्ये महिला मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व महिला कर्मचारी यांनी गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या महिलांचे फोटो लावण्यात येणार आहेत. युवा मतदान केंद्रावर सर्व युवा कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी पिवळा रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुध, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी पिवळया रंगाचे वस्त्र (टिशर्ट/शर्ट) परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या युवा यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्रज्ञ, अभिनेता यांचे फोटो लावण्यात येणार आहेत,ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदार संघामध्ये १७ मतदान केंद्रांवर दिव्यांग कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदर केंद्रासाठी फिक्कट निळा/आकाशी रंग ठरविण्यात आला आहे. मतदान केंद्रामध्ये पडदे, कारपेट, फुगे, झालर, रांगोळी, सेल्फी बुथ, मतदान केंद्राचे प्रवेशद्वार तसेच मतदान केंद्रामध्ये नियुक्त सर्व युवा कर्मचारी यांनी फिक्कट निळा/आकाशी रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतील. मतदान केंद्रामधील मंडपामध्ये भारतातील वेगवेगळया क्षेत्रामध्ये प्राविण्य मिळविलेल्या दिव्यांग यशस्वी उद्योजक, खेळाडू, शास्त्र, अभिनेता, लेखक यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. भिवंडी ग्रामिण मतदार संघामधील सारंग या गावातील मतदान केंद्र क्र.३२१ हे विशेष (युनिक) मतदान केंद्र असणार आहे. हे मतदान केंद्र ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी संस्कृतीने सजविण्यात येणार आहे. यासाठी मासे पकडण्यासाठी वापरण्यात येणारी जाळी, मासे विक्रीसाठी वापरण्यात येणा-या टोपल्या, बोट, रांगोळी साकारण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावरील कर्मचारी हे पारंपारीक कोळी वेशभुषेत असतील. २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा ‍निवडणुक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना केले आहे.

सुप्रसिध्द भजन गायक समर्थबुवा पाटील यांचा तिरुपती येथे संगीत भजनाचा कार्यक्रम

अशोक गायकवाड अलिबाग :रोहा तालुक्यातील दापोली गावचे रहिवासी व अलिबाग येथे वास्तव्यास असलेले, सुप्रसिध्द भजन गायक समर्थबुवा पाटील यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम २७ मे ला दुपारी आंध्र प्रदेशातील ‘ तिरुपती तिरुमाला देवस्थान’ येथे सादर होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना भजन रसिक आणि सल्लागार ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगितले कि, तिरुपतीमध्ये महाराष्ट्रातील प्रासादिक भजन सादर करणारे रायगड जिल्ह्यातील हे एकमेव भजन मंडळ आहे. तिरुपती देवस्थान तर्फे प्रायोजित या भजनाचे थेट प्रक्षेपण ‘एस व्ही बी सी’ या चॅनेल वर ” नाद निराजमन ‘ या कार्यक्रमातून दुपारी ठीक ३:१० ते ४:३० वा. पर्यंत सादर होणार आहे.जेष्ठ भजन गायक पं. हरिश्चंद्र बुवा लोणारकर यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित संगितबद्ध केलेल्या विविध भजन रचना या कार्यक्रमात सादर केल्या जातील. समर्थ बुवांना हार्मोनियम वर साथ नरेशबुवा कडू, तबला साथ जगदीश पाटील-लोणारकर करतील . तरुण , होतकरू कलाकार विराज म्हात्रे ( मानी ) हे पखवाज वर साथसंगत करतील. याविषयी अधिक माहिती देताना भजन रसिक आणि सल्लागार ॲड.प्रसाद पाटील यांनी सांगितले कि, तिरुपतीमध्ये महाराष्ट्रातील प्रासादिक भजन सादर करणारे रायगड जिल्ह्यातील हे एकमेव भजन मंडळ आहे. अनेक प्रतिष्ठित देवस्थान ठिकाणी या मंडळाने भजन सेवा सादर केल्या आहेत. श्रीविठ्ठल रखुमाई देवस्थान पंढरपूर, श्री अंबाबाई देवस्थान कोल्हापूर, श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, ख्वाजा हजरत मोईनउद्दीन चिस्ती दर्गा अजमेर- राजस्थान, श्री अगस्ती आश्रम अकोले, महर्षी चांगदेव देवस्थान पुणतांबा, ई. चा समावेश आहे. तिरुपती देवस्थान मध्ये कार्यक्रम सादर करण्याची ही सहावी वेळ असून मुख्य रंगमंचा वर तिसऱ्यांदा मिळालेल्या या भजन संधी बद्दल वायशेत येथील श्री. गंगादेवी भजन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी देवस्थान चे आभार व्यक्त केले आहेत व अधिकाधिक भजन रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

मतदार कामगार अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी द्या

मुंबई शहरात २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे निर्देश मुंबई,  : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने राज्यात तसेच राज्याच्या सीमेलगतच्या…

सोळा जीव घेतल्यानंतरही रेल्वेला गांभीर्य नाही

रमेश औताडे मुंबई : रेल्वे परिसर व प्लॅटफॉर्म वर प्रवाशांची सुरक्षा करणे रेल्वेचे आद्य कर्तव्य आहे. मात्र याचा विसर पाडलेल्या रेल्वे प्रशासनाला कशाचे सोयरे सुतक नाही. 16 निष्पाप जीव रेल्वेने घेतले की पालिकेने घेतले की अजून कुणी घेतले यावर सध्या तज्ञ कमिटी तपास करत आहे. 16 जीव गेल्यानंतर रेल्वेने आपल्या हद्दीतील, फालातावरील अनधिकृत प्रकार नेस्तनाबूत करण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवायला पाहिजे होती मात्र तसे दिसत नाही.असे मत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी व्यक्त केले. रेल्वे स्टेशन तिकीट विंडो जवळ बंद पडलेले आरोग्य केंद्र व त्या बाजूला अनधिकृत फेरीवाले यांच्या मनमानी वास्तव्यामुळे प्रवाशी सुरक्षा धोक्यात आली आहे. रेल्वे प्लॉटफॉर्म वर जे खाद्यपदार्थ स्टॉल आहेत त्यांनी रेल्वे रुळ पासून स्टॉलचे अंतर किती असावे या नियमांचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कोणतीही कारवाही रेल्वेने केली नाही. त्या स्टॉल वरील अनधिकृत बांधकाम कोसळून दुर्घटना होऊन प्रवाशी जीव जाऊ शकतात. ब्रिजवर चिंचोळ्या जागेतून ये जा करताना प्रवाशी जखमी होऊ शकतात. रेल्वे ब्रीजवर असणारे फेरीवाले यांनाही अभय दिले जात आहे. भिकारी,गर्दुल्ले, नशा करणारे प्रवाशी, भुरटे चोर, यांच्यावर रेल्वे पोलीस, होमगार्ड, शहर पोलिस, यांचा वचक राहिला नाही.प्रवाशांना धक्काबुक्की करत तृतीयपंथी, चोरटे, गर्दुल्ले बिनबोभाट प्रवास करत आहेत. अनेक ठिकाणी नूतनीकरण सुरू आहे त्या ठिकाणी कंत्राटदार सुरक्षा पट्टी, रेड मार्किंग, सावध फ्लॅग गार्ड आदी कोणतीही काळजी न घेता मनमानी विकास कामे सुरू आहेत. रेल्वेत झिक झ्याक अवस्थेत असलेले पंखे, टुयब लाईट, गरम होऊन स्पार्क झाले तर आगाची दुर्घटना होऊन प्रवासी जीव धोक्यात येऊ शकतो. अनेक स्थानकात जंबो पंखे बंद अवस्थेत आहेत त्याची देखभाल कंत्राटदार करत नाही. अनेक ब्रीज वर फेरीवाले जागा अतिक्रमण करून बसले असल्याने गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी होऊ शकते.रेल्वे दरवाजे कडी कोयंडा तुटल्याने दरवाजे आदळतात त्याने अपघात होऊ शकतो. या व इतर अनेक प्रकारे रेल्वे सुरक्षा गंभीर आहे.प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत व फलाटावर उभे आहेत. त्यामुळे रेल्वेने या प्रकरणी गांभीर्ययाने लक्ष देण्याची गरज आहे. नाहीतर अजून जीव जातील व सखोल तपास समिती तपास करतच राहील.असे प्रवासी बोलत आहेत.