सोनीया गांधींचे भावनिक आवाहन
रायबरेली : मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही अशा शब्दात सोनिया गांधी यांनी रायबरेली येथील नागरीकांना भावनिक आवाहन केले. जनतेला भावनिक आवाहन करत त्या म्हणाल्या की, मी माझा मुलगा जनतेसाठी…
रायबरेली : मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही अशा शब्दात सोनिया गांधी यांनी रायबरेली येथील नागरीकांना भावनिक आवाहन केले. जनतेला भावनिक आवाहन करत त्या म्हणाल्या की, मी माझा मुलगा जनतेसाठी…
मुंबई: येस बँक आणि डीएचएफएलच्या घोटाळ्यात अटकेत असलेल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अखेर जामीन मंजूर झाला असून एक लाखांच्या जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. अविनाश भोसले…
मुंबई : बारामती आणि शिरूर येथे ईव्हिएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रुममधिल सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डिसप्ले मॉनिटर बंद पडल्याच्या घटना आहेत.मात्र सीसीटीव्ही मॉनिटर बंद पडले असले तरी त्याचे रेकॉर्डींग अव्याहत यावेळी सुरू होते.तसेच स्ट्राँग रुमला तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण मुंबई: घाटकोपर येथे होर्डींग कोसळून १६ निरपराध नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या त्या होर्डींगचा मालक भावेश भिंडेला न्यायालयान येत्या २६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घाटकोपर होर्डिंग केसमध्ये भावेश भिंडेला…
रमेश औताडे मुंबई : काही वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभाराचा इतका कळस गाठतात की, त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांना वैतागून शेवटी न्यायालयाची पायरी चढावी लागते. असाच प्रकार मुंबई महानगर पालिकेत घडला आहे.…
स्वाती घोसाळकर मुंबई: लोकसभा निवडणूकीसाठी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुंबईत दोन हाय व्होल्टेज प्रचार सभा पार पडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाजीपार्कवरील एनडीएच्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर तर बीकेसीतील इंडिया आघाडीच्या सभेत घटनाकार…
माझी आणि शरद पवार, जयंत पाटील यांची भेट होण्याचे कारणच असू शकत नाही… मुंबई -पराजय समोर दिसत असल्याने तुतारीचा आवाज अजिबात झालाच नसल्यामुळे वैफल्यग्रस्त… निराश आणि हताश झालेले अनिल देशमुखांसारखे…
करणार लाखोंची कमाई मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे यंत्र, साहित्य व मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत नेऊन सोडण्याचे आणि निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना परत घेऊन आणण्याची जबाबदारी राज्य परिवहन (एसटी) महामंडळावर सोपविण्यात आली आहे. यासाठी २४६ एसटी बसचे आरक्षण करण्यात आले असून त्यातून ९० लाखांचे उत्पन्न एसटीच्या मुंबई विभागाला मिळणार आहे. एसटी महामंडळाला प्रत्येक बसमागे ८५०० ते हजार रुपये मिळणार आहेत. तीन टप्पे झालेत. राज्यात मतदानाचा पाचवा टप्पा २० मे रोजी पार पडणार आहे. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी एकूण १३ मतदारसंघांत मतदान होत असून, मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघाचाही त्यामध्ये समावेश आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेलच्या ताफ्यात पहिली स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी दाखल झाली आहे. या गाडीची जोडणी करून तिच्या चाचणीला आता सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर ही चाचणी चालणार असून त्यानंतर म्हणजेच जूनच्या मध्यावर ही गाडी सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. चेंबूर – जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्प तोट्यात असून या प्रकल्पास तोट्यातून बाहेर काढण्यासाठी, मोनोरेलची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून मोनोरेलच्या ताफ्यात १० नवीन मोनोरेल गाड्या दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. भारतातच या गाड्यांची बांधणी करण्याचे निश्चित करून एमएमआरडीएने गाड्यांच्या बांधणीचे कंत्राट मेधा सर्वो ड्राइव्हज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. या कंत्राटानुसार ही कंपनी १० मोनो गाड्यांची बांधणी करीत असून यासाठी ५९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी पहिली गाडी तयार होऊन मुंबईत दाखल झाली आहे. वडाळा कारडेपोत या गाडीची जोडणी करण्यात आली असून गेल्या आठवड्यापासून या गाडीच्या चचणीस सुरुवात करण्यात आली आहे. ही चाचणी रात्री करण्यात येत आहे. स्वदेशी बनावटीची मोनोरेल गाडी रात्री धावत आहे. दरम्यान, महिनाभर ही चाचणी सुरू राहणार आहे. त्यानंतर ही गाडी सेवेत रुजू होणार आहे. उर्वरित नऊ गाड्या टप्प्याटप्प्याने डिसेंबरपर्यंत सेवेत दाखल होणार आहेत. या सर्व दहाही गाड्या सेवेत दाखल झाल्यास आजघडीला प्रत्येक १५ ते ३० मिनिटांनी सुटणारी मोनोरेल दर सहा मिनिटांनी सुटणार आहे. यामुळे प्रवासी संख्या आणि महसूल वाढेल, असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त केला जात आहे.
कल्याण : कल्याण पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील गोविंंद करसन चौकात प्रवासी वाहतुकीच्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या परिवहन विभागाच्या बस उभ्या करून ठेवण्यात येतात. या बस मुख्य रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने या भागात दररोज वाहन कोंडी होते. या बस प्रवासी वाहतुकीसाठी गोविंद करसन चौकात वळविल्या जातात. या मोठ्या बस वळविताना अनेक वेळा वाहन कोंडी होते. या बसचा थांबा बाजारपेठ विभागातील आतील रस्त्यांवर, बाजार समिती भागातील रस्त्यांवर करण्यात यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. पत्रीपूल ते शिवाजी चौक दरम्यानचा रस्ता आता काँक्रीटचा आणि प्रशस्त करण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अलीकडे वाहन कोंडी होत नाही. परंतु, गोविंद करसन चौकात केडीएमटीच्या प्रवासी वाहतुकीच्या बस या भागात असतात. या बससाठी उभे असलेले प्रवासी चौकात मुख्य रस्त्यावर उभे असतात. एका पाठोपाठ बस रांगेत उभ्या करण्यात येत असल्याने रस्त्याचा मुख्य भाग व्यापला जातो. त्यामुळे पत्रीपुलाकडून शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना एका मार्गिकेतून जावे लागते. या रस्त्यावरून अवजड वाहन जात असेल तर ते या बसच्या कोंडीत अडकते. अनेक वेळा वाहने करसन चौकात वळण घेऊन वलीपीर रस्त्याने रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा प्रयत्न करतात ही वाहने या बसमुळे अडकतात. आणि शिवाजी चौकातील वाहने या वाहनांचामागे अडकून पडतात. करसन चौकात केडीएमटीच्या बसमुळे दररोजची कोंडी होत असल्याने या चौकातील बस इतर भागातून प्रवाशांंच्या सोयीप्रमाणे सोडण्यात याव्यात, अशा मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. या चौकाच्या परिसरात राहणारे व्यापारी, रहिवासी या सततच्या कोंडीमुळे हैराण आहेत. कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पातून कामे सुरू आहेत. या प्रकल्पाच्या ठिकाणी अडथळा नको म्हणून केडीएमटीच्या बस करसन चौकातून सोडल्या जात असल्याचे समजते.