Month: May 2024

बेकायदा पब-हुक्का पार्लरला यापुढे स्थानिक पोलीस ठाणे जबाबदार 

अनिल ठाणेकर  ठाणे : ठाण्यातील बेकायदेशीर पब, हुक्का पार्लर आणि डान्स बार प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांना जबाबदार धरण्यात येईल तसेच या अवैध व्यवसायांवर कारवाया करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याची…

भाविकांवर काळाचा घाला

पुंछमध्ये बस १५० फूट दरीत कोसळून २१ ठार जम्मू-काश्मीर : शिवखोरी येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर आज काळाने घाला घातला.भाविकांची बस १५० फूट कोसळून  २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० जण…

मियाँ-बिबी राजी, तरीही कोर्ट ‘ना राजी’

नवी दिल्ली : मियाँ-बिबी राजी तो क्या करेगा काझी ही म्हण आता फक्त डायलॉग्ज पुरती उरलीय. कारण कोर्ट ‘ना राजी’असल्याची घटना मध्य प्रदेश उच्च न्यायालयात घडलीय. मुस्लीम पुरूष आणि हिंदू…

राहुल गांधींना पुणे कोर्टाचे समन्स

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुढील तारखेला पुणेन्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी गुरुवारी दिले आहेत. राहुल यांच्या आक्षेपार्ह…

रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांसह  शिपायाला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे कार अपघात प्रकरण पुणे : पुण्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाने आपल्या पाॅर्शे  कारने दोघांना चिरडल्यानंतर त्याला निर्दोष ठरवणिसाठी मुलाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ अजय तावरे, डॉ…

जया शेट्टी खूनप्रकरणी छोटा राजन दोषी

मुंबई: मायानगरी मुंबईलाहादरवून सोडणऱ्या  मुंबईतील गोल्डन क्राऊन हॉटेलचे मालक  जया शेट्टी यांच्या खूनप्रकरणी अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंड छोटा राजन याला मुबंईतील विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.शुक्रवारी दिनांक 31 मे रोजी…

मोदींची कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा

कोची : लोकसभा निवडणूकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराची मुदत गुरवारी सायंकाळी संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारी गाठले. मोदी कन्याकुमारीमधील स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे दोन दिवस ध्यानधारणा…

ठाण्यात हिट अ‍ॅण्ड रनचे चार महिन्यांत ३६ बळी

ठाणे -ठाण्यात चार महिन्यांत हिट अ‍ॅण्ड रनने तब्बल ३६ बळी घेतल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. तर या अपघातात १०६ जण कायमचे जायबंदी झाले आहेत. तसेच या घटनेमुळे येऊर, घोडबंदर…

जम्बो ब्लॉकमुळे नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करा

मुंबई : रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवर ३१ मे ते २ जूनपर्यंत जम्बो ब्लॉक घेतला असून जवळपास ९३० लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे याचा फटका मुंबईसह, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथील प्रवाशांना बसणार आहे. दरदिवशी लाखोंच्या संख्येने नागरिक कामानिमित्त लोकलने प्रवास करतात. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यातील नोकरदार वर्गाला ‘सुट्टी’ किंवा ‘वर्क फ्रॉम होम’ जाहीर करावा, अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. मध्य रेल्वेचा मुंबई विभाग खूप संवेदनशील असून, येथे कोणतीही घटना घडल्यास, त्याचे पडसाद सर्वदूर पडतात. शुक्रवारी रात्रीपासून सीएसएमटी येथे ब्लॉक आहे. त्यामुळे ९३० लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी, लाखो प्रवाशांचे हाल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने याची माहिती अगोदर देणे गरजेची होती. परंतु, जनसंपर्क विभागाच्या सावळा गोंधळामुळे नागरिकांना प्रवासादरम्यान नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात प्रवासी घराबाहेर पडले तर गर्दीचे नियोजन रेल्वे प्रशासनाने कसे करणार? प्रवासादरम्यान चेंगराचेंगरी झाल्यास ह्याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शाह यांनी उपस्थित केले आहे. तसेच या ब्लॉकमुळे शेकडो रेल्वेगाड्या रद्द आणि शॉर्ट टर्मिनेट झाल्या आहेत. सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक व पुण्यापर्यंत चालवण्यात येतील. याशिवाय, सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, पनवेल, नाशिक स्थानकातून सुटतील. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे या भागातील अनेक प्रवाशी नोकरीनिमित्त प्रवास करतात. परंतु, मध्य रेल्वेच्या जम्बो ब्लॉकमुळे प्रवासी लोकलमधून प्रवास कसा करणार हा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे, नोकरदार वर्गाला सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होम जाहीर करावा, अशी मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

अकरावी प्रवेश प्रक्रिया

महाविद्यालय पसंतीक्रमाचा अर्जाचा दुसरा भाग ५ जूनपासून भरता येणार मुंबई : राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. सध्या विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरत आहेत. परंतु दहावीचा निकाल जाहीर होऊनही उर्वरित प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकही गोंधळात पडले आहेत. आता बुधवार, ५ जूनपासून महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. तसेच उर्वरित प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. दरवर्षी विविध कनिष्ठ महाविद्यालयातील ११ वीची प्रवेश क्षमता वाढ आणि शासनाकडून नवीन महाविद्यालयांना मंजुरी देण्यात येते. या सर्व महाविद्यालयांना केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व जागा आणि नवीन महाविद्यालयांची नोंदणी ही ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. त्यानंतर ५ जूनपासून महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येईल. तसेच उर्वरित प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे ११ वीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आतापर्यंत मुंबई महानगरक्षेत्रातील १ लाख ३३ हजार २९२ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्जाचा भाग १ भरून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ७९ हजार ४८१ विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारण्यात (लॉक) आले आहेत. तर ३८ हजार ३८८ विद्यार्थ्यांचे अर्ज प्रमाणित (ऑटो व्हेरिफाय) आणि २३ हजार ७५५ विद्यार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी ही मार्गदर्शन केंद्रावर (जीसी व्हेरिफाय) झाली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याचे टप्पे कसे? विद्यार्थ्यांनी आपले शहर निवडून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करून लॉग इन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून झाल्यानंतर आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ हा ५ जूनपासून भरता येईल. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग २ भरून किमान १ व कमाल १० महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने निवडावी लागतील.