दुसऱ्या महाकाय गर्डरची आज जोडणी
अंबाला-न्हावा-वरळी प्रवास होणार जलद मुंबई :मुंबई किनारी (कोस्टल) मार्गावरून वांद्रे- रळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गाची दुसरी महाकाय तुळई (गर्डर) अंबाला (हरयाणा) येथून मुंबईत दाखल झाली आहे. ही तुळई मंगळवारी पहाटे…
अंबाला-न्हावा-वरळी प्रवास होणार जलद मुंबई :मुंबई किनारी (कोस्टल) मार्गावरून वांद्रे- रळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या मार्गाची दुसरी महाकाय तुळई (गर्डर) अंबाला (हरयाणा) येथून मुंबईत दाखल झाली आहे. ही तुळई मंगळवारी पहाटे…
कल्याण : कल्याण लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू असल्याने कल्याण डोंबिवली पालिकेचा अधिकारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त आहे, असा विचार करून भूमाफियांनी कल्याण पूर्वेतील व्दारली, नांदिवली तर्फ भागात रस्ते, मोकळ्या जागा अडवून तेथे बेकायदा गोदामे, बेकायदा चाळी उभारल्या होत्या. याविषयी तक्रारी प्राप्त होताच, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी नऊ गोदामे, याच भागातील बेकायदा चाळी जेसीबी यंत्र आणि तोडकाम पथकाच्या साहाय्याने शुक्रवारी भुईसपाट केल्या. कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ, व्दारली गाव हद्दीत भूमाफियांनी गाव हद्दीतील मोकळ्या जागा हडप करून तेथे गोदामांची आणि बेकायदा चाळींची बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांना तातडीने रंगरंगोटी करून या गोदामांचा वापर, खोल्यांमध्ये रहिवास सुरू करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या होत्या. याविषयीची कुणकुण लागताच आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी निवडणूक कामातून वेळ काढून नांदिवली तर्फ, व्दारली येथील गोदामे, बेकायदा चाळी तोडकाम पथक, जेसीबीच्या साहाय्याने शुक्रवारी जमीनदोस्त केल्या. यावेळी गुन्हा दाखल होईल या भीतीने भूमाफियाने पळून गेले होते. दहा प्रभागांमध्ये आय प्रभागात सर्वाधिक बेकायदा बांधकामांविरुध्द कारवाई सुरू असल्याने माफियांचे कंबरडे मोडले आहे. या सततच्या कारवाईने आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या आक्रमक कारवाईचे कौतुक केले आहे. बांधकामे जैसे थे पालिकेच्या डोंबिवली विभागातील ह आणि फ प्रभागात बेफाम बेकायदा बांधकामे सुरू आहेत. परंतु, या प्रभागाचे साहाय्यक आयुक्त आम्ही लोकसभा निवडणूक कामात खूप व्यस्त असे तक्रारदारांना सांगून या बेकायदा बांधकामांना अभय देत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ह प्रभागात कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटील यांच्या बेकायदा कोंबड्याच्या खुराड्यावर कारवाई न केल्याने या खुराड्यात कोंबड्या, त्यांची पिल्ले आणून व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. ठाकुरवाडीतील भूमाफिया प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या फशी हाईट्स, गटारवरील दोन बेकायदा इमारती, जुनी डोंबिवलीतील धिरेंद्र भोईर यांनी तक्रार केलेली शिवलिला, राहुलनगर मधील सुदामा, रमाकांत आर्केड इमारती, कुंभारखाणपाडा हरितपट्टयावरील बेकायदा बांधकामे सुरू आहेत. फ प्रभागात खंबाळपाडा, सुयोग हॉल गल्लीतील आराधना पुनर्निमाणाच्या इमारतीचे बेकायदा बांधकाम वेगाने पूर्ण करण्याच्या हालचाली माफियांनी सुरू केल्या आहेत. आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना निवडणूक कामातून बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी वेळ मिळतो, मग फ आणि ह प्रभागातील अधिकारी बेकायदा बांधकामांविषयी उदासिन का, असे प्रश्न तक्रारदार करत आहेत. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या निर्देशानुसार आय प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. जुन्या बेकायदा बांधकामांच्या तक्रारी प्राप्त होत्याच ती बांधकामेही विहित प्रक्रिया पूर्ण करून तोडली जात आहेत. आय प्रभागात नवीन बेकायदा बांधकाम सुरू असल्याची तक्रार प्राप्त होताच तातडीने ती बांधकामे तोडली जातात. – हेमा मुंबरकर,साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण.
अनिल ठाणेकर ठाणे : भिवंडीतील महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी दिली आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची या मतदारसंघात शहापूर, वाडा, भिवंडी व मुरबाड या चार तालुक्यांत बऱ्यापैकी व वाढती ताकद आहे. या सर्व तालुक्यांतून, आणि विशेषतः शहापूर व वाडा तालुक्यांतून, माकपचे कार्यकर्ते हातात लाल बावटे घेऊन आणि लाल स्कार्फ घालून मोठ्या संख्येने आले होते. सभेतील मविआच्या प्रमुख वक्त्यांना त्याची दखल घ्यावी लागली.रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी-पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश म्हात्रे (उर्फ बाळ्या मामा) यांच्या प्रचारासाठी वासिंद, ता. शहापूर, जि. ठाणे येथे प्रचंड सभा झाली. भिवंडी लोकसभा मतदारसंघात ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांचे भाग येतात. येथे मुख्य लढत मविआचे सुरेश म्हात्रे विरुद्ध भाजपचे विद्यमान खासदार आणि पंचायत राज चे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यामध्ये आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भिवंडी मतदारसंघातील शहापूर, वाडा, भिवंडी व मुरबाड या चार तालुक्यांत बऱ्यापैकी वाढती ताकद आहे. या सर्व तालुक्यांतून, आणि विशेषतः शहापूर व वाडा तालुक्यांतून, माकपचे कार्यकर्ते हातात लाल बावटे घेऊन आणि लाल स्कार्फ घालून मोठ्या संख्येने सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत आले होते. सभेतील मविआच्या प्रमुख वक्त्यांना त्याची दखल घ्यावी लागली. जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, उमेदवार सुरेश म्हात्रे, तसेच स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. सर्व वक्त्यांनी मोदी-शहा-प्रणित भाजप केंद्र सरकारच्या सर्वच क्षेत्रांतील दिवाळखोरीवर, तसेच शिंदे-फडणवीस-अजित पवार राज्य सरकारच्या अनैतिक व भ्रष्ट कारभारावर आसूड ओढले. वक्त्यांनी मांडले की देशभर आणि महाराष्ट्रातही या निवडणुकीचे वारे भाजपच्या विरुद्ध वाहू लागले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात जनविरोधी, धनिकधार्जिणे, हुकूमशाही, धर्मांध आणि भ्रष्ट अशा भाजपच्या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी भिवंडीतून मविआचे सुरेश म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन सर्वांनी केले.
गडकरी रंगायतन आणि घाणेकर नाट्यगृहात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी दिला जातो मतदानाचा संदेश ठाणे : लोकसभेच्या निवडणुकीत २० मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे याबद्दल ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे. याच उपक्रमात ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे. त्यामुळे हजारो नाट्यरसिकांना मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जात आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. गडकरी रंगायतनची आसन क्षमता एक हजार प्रेक्षकांची आहे. तेथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात. शनिवार-रविवारी हे प्रमाण तीन प्रयोगापर्यंत जाते. तर, घाणेकर नाट्यगृहाची आसनक्षमता ११०० प्रेक्षकांची आहे. येथे दररोज किमान एक प्रयोग होतो तर, शनिवार-रविवारी किमान दोन प्रयोग होतात. घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात. या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभागी वाढविण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेद्वारेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मिडिया,आशा सेविका तसेच महापालिकेच्या विविध उपक्रमातंर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलेला आहे. त्याचबरोबर, मिनी मॅरेथॉन आणि फ्लॅश मॉबच्या माध्यमातूनही मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला आहे.
वाचक मनोगत डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी आलेल्या निकालाचे फिर्यादी आणि आरोपी अशा दोन्ही पक्षांनी स्वागत केले असले, तरी या प्रकरणात अपेक्षित न्याय झाला असे दोन्ही पक्षांना वाटत नाही ज्यामुळे हे दोन्ही…
पर्यावरण महेश देशपांडे उत्तराखंडमधील डोंगराळ भागातील जंगले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. या हंगामात जंगलाला आग लागण्याच्या ८८६ घटना घडल्या असून आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला तर पाचजण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर…
आम्ही या देशातून इंग्रजांना घालवले तर मोदींचे काय घेऊन बसलात? अशा आशयाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल एका प्रचारसभेत केल्याचे वृत्त आहे. आम्ही म्हणजे काँग्रेसने इंग्रजांना घालवले…
मोदींचा TMC वर हल्लाबोल नवी दिल्ली : एका टीएमसी नेत्याचे म्हणणे आहे की, ते हिंदूंना भागीरथी नदीत फेकून देतील. त्यांच्यात एवढं बोलण्याची हिंमत कुठून येते? त्यांचे समर्थन कोण करत आहे?…
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं वातावरण तापलं आहे. निवडणुकीच्या वातावरणात राजकीय नेते विविध मुलाखतींमधून विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. २०१९ साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर…