पश्चिम रेल्वेची एसी लोकल सुसाट
एका दिवसात दोन लाख प्रवाशांचा प्रवास मुंबई : उन्हाळ्यात उकाड्यापासून बचावासाठी आता पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी आपला मोर्चा एसी लोकलकडे वळविला आहे. सोमवारी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमधून तब्बल दोन…
एका दिवसात दोन लाख प्रवाशांचा प्रवास मुंबई : उन्हाळ्यात उकाड्यापासून बचावासाठी आता पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांनी आपला मोर्चा एसी लोकलकडे वळविला आहे. सोमवारी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलमधून तब्बल दोन…
लोकसभा लढवणाऱ्या शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक खुलासा मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेले जोगेश्वरी पूर्वचे आमदार आणि आता उत्तर पश्चिम मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या…
मुंबईः ठाण्यातल्या दिवा स्टेशनवर एक अजबच प्रकार घडला आहे. वरच्या दिशेला जाणारा सरकता जिना अचानक खालच्या दिशेला सरकू लागला. त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला…
अंबरनाथ, उल्हासनगर आणि दिव्यातील रॅलीला कार्यकर्त्यांसह नागरिकांचा तुफान प्रतिसाद डोंबिवली : कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. एकीकडे वैयक्तिक भेटीगाठींवर भर देण्यात…
उल्हासनगर : उल्हासनगर मनपा क्षेत्रातील धोकादायक इमारतींविरुध्द पावसाळ्यापूर्वी पाहणी करुन नियमानुसार कारवाई करण्यात येत असते. शहरात पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी शहरातील ज्या इमारती सकृतदर्शनी धोकादायक दिसून येत…
अशोक गायकवाड नवी मुंबई :भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकी संदर्भात माहिती व सूचना देण्याकरिता विविध पक्षाच्या प्रतिनिधींची…
मुंबई : निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणातील रेल्वे प्रवासही भूरळ घालणारा आहे. मुंबई-गोवा रेल्वे प्रवासात नयनरम्य हिरवळ, धबधबे, नद्या आदी दृष्य ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्याची संधी देणारा विस्टाडोम डबा मुंबई – मडगाव जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. इतर सर्व डब्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट भाडे असलेला हा डबा गणेशोत्सव काळात पूर्णपणे आरक्षित झाला आहे. विस्टाडोम डब्यातील तिकिटासाठी प्रतीक्षा यादी सुरू झाली आहे. तर ६ सप्टेंबर रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या विस्टाडोम डब्याच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने सर्वात प्रथम मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला काचेचे छत आणि रुंद खिडक्या असलेला विस्टाडोम डबा २०१८ साली जोडण्यात आला. या डब्याला वाढणारा प्रतिसाद पाहून मुंबई – मडगाव मार्गावरील तेजस एक्स्प्रेसला २०२२ मध्ये दुसरा विस्टाडोम डबा जोडण्यात आला. तेजस एक्स्प्रेसला विस्टाडोमचे दोन डबे आहेत. त्यामुळे गणेशोत्सव काळात विस्टाडोम डब्यातून प्रवास करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. नोकरीनिमित्त कोकणातील मूळगावापासून बाहेर गेलेला कोकणी माणूस गणेशोत्सवानिमित्त कोकणाची वाट धरतो. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव आहे. त्यापूर्वीच अनेक कोकणवासीयांनी गावी जाण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मंगळवारपासून तिकीट काढण्यासाठी दगदग सुरू आहे. मात्र, कोकणात जाणाऱ्या बहुतांश सर्वच रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेश दिसत आहेत. आता कोकणात जाणाऱ्या जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेसचा विस्टाडोम डबाही प्रतीक्षा यादीत आहे. जनशताब्दी एक्स्प्रेसच्या ४, ५, ६ सप्टेंबर रोजीच्या द्वितीय आसन श्रेणीची आणि ५,६ सप्टेंबरची वातानुकूलित आसन श्रेणीची प्रतीक्षा यादी ‘रिग्रेट’ दाखवित आहे. तर, विस्टाडोम डब्याची ४ आणि ५ सप्टेंबरची प्रतीक्षा यादी अनुक्रमे ३२, ४९ वर होती. तर, ६ सप्टेंबर रोजीचे तिकीट आरक्षण ९ मेपासून सुरू झाले. या विस्टाडोम डब्याची प्रतीक्षा यादी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ नंतर ‘रिग्रेट’ दाखवित होती. तेजस एक्स्प्रेसच्या दोन विस्टाडोम डब्याचे आरक्षण सुरू झाले असून ५ सप्टेंबर रोजीची प्रतीक्षा यादी २३ झाली होती.
मे महिन्यात केवळ दहा दिवसांत तीन हजारांहून अधिक घरांची विक्री मुंबई : घर खरेदीसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून बाजारपेठेतील सर्व व्यवहारांना तेजी आल्याचे चित्र आहे. घरांची चौकशी, नोंदणी, घरांचा ताबा, गृहप्रवेश आणि नवीन प्रकल्पांचा आरंभ असे व्यवहार आज तेजीत आहेत. तर दुसरीकडे मे महिन्याच्या केवळ पहिल्या दहा दिवसांत मुंबईत तीन हजारांहून अधिक घरांची विक्री झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला घर, सोने, वाहन खरेदीचा मुहूर्त साधला जातो. त्यामुळे सहाजिकच या दिवशी मालमत्ता बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी घर खरेदी करण्याकडे वा नवीन घरात प्रवेश करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे या दिवशी मालमत्ता बाजारपेठेतील सर्वच व्यवहार तेजीत असतात. परिणामी, मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच तीन हजार २८० घरांची विक्री झाली आहे. घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला २९२ कोटी रुपये महसूल मिळाला आहे. अक्षय तृतीयेला घरविक्रीत वाढ होते. या संधीचा फायदा घेण्यासाठी विकासक अक्षय तृतीयेला अनेक सवलती देतात. यंदाही विकासकांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक सवलती दिल्या आहेत. काहींनी घर खरेदीवर सवलत जाहीर केली आहे, तर काहींनी मुद्रांक शुल्क वा इतर शुल्क माफी वा शुल्कात सवलत देऊ केली आहे. त्याचवेळी काही विकासकांनी विविध भेटवस्तू देऊ केल्या आहेत. सोन्या-चांदीच्या नाण्यांपासून अगदी मोड्युलर किचन, फर्निचर आदी भेटवस्तूंचा यात समावेश आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त ग्राहक आणि विकासकांसाठी महत्त्वाचा असतो. विकासक या दिवशी नवीन प्रकल्पांना सरुवात करतात. त्यानुसार आज मुंबईत अनेक ठिकाणी नवीन गृहप्रकल्पांना सुरुवात होत असल्याची माहिती बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली.
ठाणे : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवी मुंबईतील माजी नगरसेवक मनोहर मढवी यांना ठाणे पोलिसांनी खंडणी प्रकरणी अटक केली होती. गुरुवारी त्यांना ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे एम. के. मढवी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवी मुंबईतील ऐरोली भागात एम. के. मढवी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. शिवसेना फूटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे.एम. के. मढवी हे खासदार राजन विचारे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. कळवा येथील एका कंत्राटदाराला ऐरोली भागात खोदकाम करायचे होते. त्यासाठी मढवी यांनी कंत्राटदाराकडून दीड लाख रुपये खंडणी उकळली होती. २७ एप्रिलला ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मढवी यांना आणखी एक लाख रुपयांची खंडणी घेताना पकडले होते. या घटनेनंतर ठाकरे गटाकडून या कारवाईचा निषेध केला जात होता. ही कारवाई राजकीय सूडामुळे झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. एम. के. मढवी यांनी ठाणे न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. गुरुवारी ठाणे न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत त्यांना जामीन मंजूर केला.
ठाणे : निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ठाणे पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्र जप्त करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४ हजार ४५७ परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी ३ हजार ७४८ अग्निशस्त्र पोलिसांनी जप्त केले आहेत. काही महिन्यांपूर्वी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर परवानाधारक अग्निशस्त्राने गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी परवानाधारक अग्निशस्त्राविषयी सावधगिरीची पावले उचलली आहेत. ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघातील बहुतांश भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहराचा भाग येतो. तर या लोकसभा मतदारसंघांचा उर्वरित भाग ठाणे ग्रामीण, मिरा भाईंदर आणि नवी मुंबई क्षेत्रात येतो. निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत शस्त्र परवानाधारकांनी शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करणे बंधनकारक असते. निवडणुकीच्या वेळी अग्निशस्त्रांचा वापर करता येत नाही. अग्निशस्त्र वापरणाऱ्यांकडून मतदारांवर प्रभाव पाडणे, धमकावणे किंवा मतदारांना एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान करण्यास भाग पाडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच निवडणुका निष्पक्ष पार पाडल्या जाव्यात म्हणून पोलिसांकडून ही अग्निशस्त्रे जप्त केली जातात. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात एकूण ४ हजार ४५७ परवानाधारक अग्निशस्त्र आहेत. त्यापैकी ३ हजार ७४८ अग्निशस्त्र जप्त करण्यात आली आहेत. असे असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव काही जणांना त्यातून वगळण्यात आले आहे. तर काहींना सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र बाळगण्याची सक्ती आहे. बँक सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा संस्थांचे सशस्त्र कर्मचारी, कर्तव्यावर असलेले सरकारी कर्मचारी आणि अंगरक्षक यांच्या सक्तीमुळे शस्त्रे ठेवण्यास सूट देण्यात येते. उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्या बंदुकीने शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. यात महेश गायकवाड बचावले असले तरी या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यामुळे ठाणे पोलिसांनी शस्त्र वापरकर्त्यांवर लक्ष ठेवले आहे.