Month: May 2024

शिंदेंचे आमदार सुहास कांदेनी मागितला भुजबळांचा राजीनामा

नाशिक:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत आहेत.  त्यांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचा दात वेगळे आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्याचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आले आहेत, असा दावा करीत…

पुरातत्व संचलनायाच्या सहाय्यक संचालक काळेंना लाच घेताना अटक; संचालक फरार

नाशिक: राज्य पुरातत्त्व विभागाच्या नाशिकच्या सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांना दीड लाखांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचलनालयाचे संचालक तेजस मदन गर्गे…

उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज: देवेंद्र फडणवीस

मुंबई : उद्धव ठाकरे यांचा तोल सुटलेला आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता आहे. त्यांनी एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांना दाखवावे. त्यांची मदत घ्यावी, असा पलटवार प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  या स्तराला जाऊन एखाद्या पक्षाचा प्रमुख बोलतो, त्यावेळी निश्चितपणे…

रविंद धंगेकरांसाठी आता  उद्धव ठाकरे मैदानात

पुणे : पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. पुण्यामध्ये पुन्हा 11 मे रोजी नदीपात्रामध्ये उद्धव ठाकरे यांची रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.…

वीजग्राहकांसाठी महावितरणचे ‘ऊर्जा’ चॅट बॉट

मुंबई:  महावितरणने राज्यातील ३ कोटी वीजग्राहकांसाठी ऑनलाइनद्वारे घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी ‘ऊर्जा’ चॅट बॉट २४x७ महावितरणच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपवर…

भाजपा जिंकल्यास मुस्लीम आरक्षण रद्द करु : अमित शाहा

तेलंगणा : भाजपा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लिम आरक्षण रद्द करू आणि अनूसुचित जाती, अनूसुचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचं (ओबीसी) आरक्षण वाढवू असे जाहीर आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे. तेलंगणाच्या भोनगीर लोकसभा मतदारसंघात…

ड्रग्सवरील कारवाई कोणत्या मंत्र्यांच्या सांगण्यावरून रोखली?

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांना सवाल मुंबई : महाराष्ट्रातील युवकांना नशेबाज करणाराड्रग्सचा साठा नाशिक ते लोणावळा या दरम्यान आहे. परंतु, अजूनही तिथे छापा टाकला जात नाही. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावं की, त्यांना केंद्रातील कोणत्या मंत्र्यांकडून सूचना…

नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास डळमळीत झालाय- शरद पवार

सातारा : इंडिया आघाडीला महाराष्ट्रात मिळणारा पाठींबा पाहुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे. आपले पंतप्रधानपद धोक्यात आल्याची त्यांना भीती वाटत आहे, अशी टीका करतानाच राज्यातून इंडिया आघाडीचे ३० ते ३५ खासदार निवडून येतील, असा विश्वास…

चंद्रकांत पाटीलांच्या विधानावर अजित पवारांची टीका

पुणे: एन निवडणूकीच्या धामधुमीत शरद पवारांचा बारामतीत पराभव करायचा आहे हे चंद्रकांत पाटील यांचे विधान अनाठायी होती. अशा स्वरुपाच्या विधानाची गरज नव्हती, त्यामुळे बारामतीत नाराजी पसरली अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी…

उल्हासनगरात डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या विकास रथाचे पप्पू कलानी, कुमार आयलानी सारथी

उल्हासनगर : महायुती मधील सर्व धर्मीयांसोबत उल्हासनगरातील तमाम सिंधी नेते आणि राजकीय वैरी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना पुन्हा तिसऱ्यांदा जिंकून देण्यासाठी एकवटले असून डॉ.शिंदे यांच्या विकास रथाचे माजी आमदार पप्पू कलानी,आमदार कुमार आयलानी सारथी बनल्याचे चित्र उल्हासनगरातील रॅलीत बघावयास मिळाले आहे. या सुखावून टाकणाऱ्या चित्रांमुळे संपूर्ण शहरातून महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांना रेकॉर्डब्रेक मते मिळणार आणि ते विजयाची हॅटट्रिक मारणार असा विश्वास कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी 8 तारखेला सायंकाळ पासून शहरातून दोन टप्यात डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या रॅली काढण्यात आल्या.पहिला टप्पा हा अंबरनाथ विधानसभा व कल्याण पूर्व विधानसभेतील कॅम्प नंबर 5 नेताजी चौक ते कॅम्प नंबर 4 ओटी सेक्शन. या रॅलीत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सोबत जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,आमदार डॉ.बालाजी किणीकर,आमदार कुमार आयलानी,शिवसेनेचे चंद्रकांत बोडारे,अरुण आशान,राजेंद्र चौधरी,रमेश चव्हाण,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री,भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी,टीम ओमी कलानीचे कमलेश निकम,मनोज लासी,पीआरपीचे प्रमोद टाले,महिला आघाडी यांनी मोठया संख्येने भाग घेतला. पप्पू कलानी-कुमार आयलानी एकत्र रात्रीचा उल्हासनगर विधानसभा क्षेत्रातील दुसरा टप्पा हा लक्षवेधक ठरला.या रॅलीत डॉ.श्रीकांत शिंदेंसोबत सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे प्रणेते,चारदा आमदार म्हणून निवडून आलेले व जन्मठेपेच्या शिक्षेतून बाहेर आलेले माजी आमदार पप्पू कलानी,विद्यमान आमदार कुमार आयलानी,आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव,भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री,मनसेचे शहराध्यक्ष संजय घुगे आदी सहभागी झाले होते. राजकीय वैरी एकवटले विशेष म्हणजे युथ आयकॉन ओमी कलानी यांच्या टीम ओमी कलानी सोबत कुमार आयलानी,प्रदीप रामचंदानी,भगवान भालेराव,भारत गंगोत्री यांचे राजकीय गणित जुळत नसून त्यांचे राजकीय वैर हे अनेकदा मासमीडियावर उघड होते.असे असले तरी डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सोबत पप्पू कलानी,कुमार आयलानी,भगवान भालेराव,प्रदीप रामचंदानी,भारत गंगोत्री हे एकाच रथावर एकवटल्याने डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रथी महारथिंची मोट बांधली असा सकारात्मक सूर उमटू लागला आहे. डॉ.श्रीकांत शिंदे-ओमी कलानी यांचे दोस्ती का गठबंधन ओमी कलानी यांची पत्नी पंचम ओमी कलानी ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षा आहेत.मात्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याशी मैत्रीचे नाते असल्याने ओमी कलानी यांनी डॉ.शिंदे यांच्यासोबतचे दोस्ती का गठबंधन जाहीर केलेले आहे.त्यासाठी त्यांनी 5 हजार स्टिकर्स तयार केले असून त्याचे अनावरण डॉ.शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहेत.याशिवाय डॉ.शिंदे यांच्या प्रचारासाठी दोन प्रचार रथ सज्ज केलेले आहेत.