Month: May 2024

मतदानाच्या जागृतीसाठी ठाण्यात शनिवारी मिनी मॅरेथॉन

ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाऊंडेशन यांचा संयुक्त उपक्रम ठाणे  : येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात, शनिवार, ११ मे ला सकाळी मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले…

मतदाराला कुठल्याही प्रकारचा त्रास न व्हावा यासाठी मतदान केंद्रांबाहेर योग्य त्या सुविधा द्या–सुरेश म्हात्रे

राजीव चंदने मुरबाड : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असल्याने व मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अशी मागणी भिवंडी लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी भिवंडी लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे. सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली असून तापमान ४० ते ४२ अंशापर्यंत पोहोचले आहे.२० मे रोजी भिवंडी लोकसभेसाठी मतदान होणार असून या काळातही तापमानात वाढ असणार असल्याने मतदारांना मतदान केंद्राबाहेर उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी व वाढत्या तापमानामुळे मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी मतदान केंद्रानबाहेर मंडप, पिण्याचे पाणी, पंखे, खुर्च्या व खेळती हवा राहील अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सुरेश म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे  केली आहे.

संघर्षपूर्ण राजकारणाची शक्यता

लोकसभा निवडणुकीला सुरूवात होऊन जवळपास निम्मा काळ लोटला आहे. सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान दोन ते तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे या वर्षी उन्हाळा…

महाग आरोग्यविमा आणि बरंच काही…

अर्थनगरीतून महेश देशपांडे अर्थविश्वात सरत्या आठवड्यात लक्षवेधी बातम्यांची रेलचेल होती. यापैकी सामान्यांच्या दृष्टीने महत्वाची बातमी म्हणजे आरोग्य विम्याचा हप्ता महागणार आहे. याखेरीज विमानप्रवासात जादा सामान नेल्यास खिशावर अतिरिक्त भार पडणार…

‘बीएसएनएल’चा अस्तित्वासाठी लढा

‘बीएसएनएल’ही सरकारी दूरसंचार कंपनी सध्या संकटात आली असून आपले अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडत आहे. तसा दावा ‘बीएसएनएल एम्प्लॉईज युनियन’ने केला आहे. या युनियनने केंद्र सरकारला थेट पत्र लिहून या समस्येकडे सरकारचे…

बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणारे आधुनिक भगीरथ : कर्मवीर भाऊराव पाटील

दिन विशेष श्याम ठाणेदार बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवणारे आधुनिक काळातील भगीरथ रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज…

निवडणूकीनंतर अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील

मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात विरोधकांच्या गोटातील काही पक्षांची पुर्नरचना होण्याचे संकेत मिळत आहेत. पुढील दोन वर्षात विविध…

मोदींच्या नेतृत्वाखाली देशात शिवशाही- रामराज्य आणणार

मावळ, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देशात शिवशाही आणि रामराज्य आणायचे आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  सांगितले. मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केलेले काम…

मेलो तरी चालेल पण कमळावर लढणार नाही !

मुंबई : मेलो तरी चालेल पण कमळ, हात आणि धनुष्यबाण चिन्हावर कधीही निवडणूक लढवणार नाही असं वक्तव्य महायुतीचे परभणीतील उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं आहे. काहीही झालं तरी मी…