Month: May 2024

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा निषेध

ठाणे : मनुस्मृती प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाण्यात निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फडल्या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड तसेच मनुस्मृतीचे श्लोक शिक्षणाच्या पाठ्य पुस्तकात आणू पाहणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि मनुस्मृतीची प्रतिमा फाडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. ठाण्यातील कोर्ट नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर बुधवार (ता.३०) दुपारी हे आंदोलन झाले. राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षणाच्या पाठ्यक्रमात मनुस्मृती मधील काही श्लोकचा समावेश करण्याचा निर्णय जाहीर करताच त्या विरोधात आंबेडकरी जनतेमध्ये रोष पसरल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृती पुस्तकाचे दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली. त्याविरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण पसरले. वंचित बहुजन आघाडीने बुधवारी ठाण्यात निदर्शने केली. यावेळी आव्हाड यांच्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मनुस्मृती यांच्या प्रतिमा झळकावून त्या फाडण्यात आल्या. आमदार जितेंद्र आव्हाड हे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण त्याचसोबत पाठ्यक्रमात मनुवाद घुसवणे हे देखील निषेधार्थ आहे. त्यामुळे हे सरकारही आंबेडकर आणि संविधान द्रोही असल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष भोला मंडल, शरणंम् फाऊंडेशन चे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे शहर जिल्हा उप अध्यक्ष भोला मंडल, शरणं संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, उद्धव पळसपगार, सुनील कांबळे, भास्कर जाधव, साबळेताई, सोमनाथ पाटील, फुलचंद हौसमल, सुनील कडाळे, उषा काटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे नगर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

आपत्ती निवारण आराखडा तयार करावा- अशोक शिनगारे

मान्सून कालावधीतील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी ठाणे : पावसाळ्यात होणाऱ्या आपत्ती टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी आतापासून आपत्ती निवारण आराखडा तयार करावा. तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रादेशिक आपत्ती नियंत्रण कक्ष उभारावे. तसेच संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने प्राथमिक उपाययोजनासंदर्भात प्रशिक्षण सत्र आयोजित करावेत, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आल्या. मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना संभाव्य आपत्तीच्या अनुषंगाने पूर्व तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, ठाणे महानगरपालिका उपायुक्त जी.जी. गोदापुरे, महामार्ग पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपअधीक्षक विजय डोबल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सिद्धार्थ तांबे, लघु पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे, ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक निकम, भिवंडी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजेंद्र वरर्णीकर यांच्यासह दूरसंचार विभाग, नागरी संरक्षण दल, वाहतूक विभाग, महावितरण, एनडीआरएफ, एसडीआरएफ व टीडीआरएफचे अधिकारी, नगरपालिका/नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, प्रादेशिक परिवहन विभाग आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मान्सून काळात जिल्ह्यात कोणतीही आपत्ती घडू नये, यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. तसेच संभाव्य आपत्ती निवारणासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाळ्याच्या कालवधीत पावसाची आकडेवारी नोंदविण्यासाठी पर्जन्यमापक यंत्रे सुव्यवस्थित ठेवणे, दैनंदिन पर्जन्यमानाची आकडेवारी गोळा करणे, आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू ठेवावे, धोकादायक पूल, रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या. मान्सून कालावधीत साप, विंचू दंश यावरील प्रभावी औषधांचा साठा उपलब्ध करावा. साथीच्या रोगांवरील उपाययोजना करण्यासाठीही औषधे/लसींचा साठा पुरेशा प्रमाणात ठेवण्यात यावा. जनावरांना होणारे आजारांसाठी लागणारे औषधे उपलब्ध होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. महापालिका, रेल्वे विभागांनी समन्वयाने नालेसफाई, गटारांची सफाईची कामे वेळेआधी पूर्ण करावीत. महापालिका, नगरपालिकांनी त्यांच्या हद्दीतील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींची माहिती तयार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

अपघातांच्या ‘ब्लॅक स्पॉट’चे संयुक्त सर्वेक्षण आणि उपाययोजना करा –  किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड : मुंबई गोवा महामार्ग तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांचे (ब्लॅक स्पॉट) अपघातांची कारणे व त्याबाबतच्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करुन अपघात रोखण्यासाठी तेथे करावयाच्या उपाययोजना निश्चित…

बाबरी ध्वस्त होऊन राममंदिर व्हावे ही तर नरसिंहरावांची इच्छा !

विशेष योगेश त्रिवेदी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा दिवसांत तब्बल पाच विभूतींना भारतरत्न किताब जाहीर करुन इतिहासात अनोखा विक्रम नोंदविला आहे. आधी समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर मग माजी उपपंतप्रधान…

पवारांचे प्रतिमा भंजन !

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष, राज्याचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गाजलेले कृषीमंत्री शरदराव पवार यांच्या उत्तुंग प्रतिमेचे तुकडे पाडण्याचे काम त्यांच्याच एके काळच्या चेले-चपाट्यांनी जोरात सुरु केले असून महाराष्ट्र…

उकाड्यात पशुधनाची काळजी घ्या !

वाचक मनोगत मागील काही दिवसांत राज्यासह देशभरात उष्णतेची जीवघेणी लाट आली आहे. अनेक प्रांतातील तापमान आज अर्धशतक साजरे करू पाहत आहे. आजतागायत न अनुभवलेला उकाडा यंदा सहन करावा लागत आहे.…

ग्लोबल वॉर्मिंग आणि जागतिक हवामान खात्याचे भाकीत

विशेष श्याम ठाणेदार यावर्षीचा उन्हाळा हा आजवरचा सर्वात कडक उन्हाळा समजला जात आहे. यावर्षी सर्वच शहरांचे तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे काही शहरांचे तापमान तर ४२ ते ४५ अंशाच्या…