Month: June 2024

आरक्षणासाठी काँग्रेसचा नितिशकुमारांना पाठिंबा

नवी दिल्ली : आरक्षणाची ५० टक्क्यांपेक्षा अधिक मर्यादा करण्याच्या नितीशकुमार यांच्या मागणीला काँग्रेसने आज पाठिंबा देणारी भुमिका घेतली आहे. यासाठी संसदेत कायदा संमत केला जावा असे वक्तव्य काँग्रेसने केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी याबाबतची पोस्ट केली…

राज्याच्या मुख्य सचिवपदी पहिल्यांदाच महिला अधिकारी

मुंबई : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती झाली असून ते या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. सुजाता सौनिक या 1987 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सुजाता सौनिक याचे पती मनोज सौनिक यांनीदेखील राज्याचे…

अजित पवारांना धक्का; १६ नगरसेवक बंडाच्या तयारीत

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला गळती लागण्यास सुरुवात झाली असून पिंपरी चिंचवडचे १६ नगरसेवक बंडाच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांची या १६ माजी नगरसेवकांनी भेट घेतल्याची…

इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा चेंडू पुन्हा राज्यांच्या कोर्टात

इंधन दरवाढीने त्रस्त असलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार करत आहे. असे झाल्यास इंधनाच्या किमती तब्बल वीस रुपयांनी कमी होण्याची शक्यता…

धर्मवीर-२ क्रांती दिनी प्रदर्शित होणार

मुंबई : शिवसेनेच्या आनंद दिघे यांचा जीवनपट असणाऱ्या धर्मवीर -२ या सिक्वेल चित्रपटाचे प्रदर्शन येत्या ९ ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून केले जाणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा…

१४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले!

२९ जून २०२४ ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली गेली आहे कारण या दिवशी टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करून टी २०…

अकल्पित, अविस्मरणीय!

विशेष श्रीशा वागळे गेल्या अकरा वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. भारतीय संघाला हुलकावणी देणारा विश्वविजय वेस्ट इंडिजच्या भूमीत साकारला. भारतीय संघ या स्पर्धेत ‘चॅम्पियन’सारखा खेळला आणि ‘चॅम्पियन’ ठरला. तमाम भारतीय क्रिकेट…

निवडणूक संकल्प !

राज्याचा दहावा आणि विधानसभा निवडणुकी आधीचा अखेरचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृह व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस या तिघांच्याही मनात लोकसभा निवडणुकीत झालेले…

आज जागतिक खोके आणि धोके दिवस- आदित्य ठाकरे

मुंबई : “आज जागतिक खोके आणि धोके दिवस साजरा होत आहे. निर्लज्जपणे आज खोके दिवस साजरा केला जातोय.”, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य फेसबूकवर टीका…