मुंबई : भारताची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहे. इथं नाक्या नाक्यावर एखादा हटके पदार्थ चाखायला मिळतो आणि त्याची थेट जगही दखल घेतं. भारतीय खाद्यसंस्कृतीची दखल वेळोवेळी जगानंही घेतलीय. आता मुंबईनं मानाचा तुरा रोवलाय. जगात सर्वोत्तम फूड मिळणाऱ्या टॉप-१० शहरांच्या यादीत ‘आपल्या मुंबई’चाही समावेश झाला आहे.

फूड, लाइफस्टाइल आणि एन्टरटेन्मेंट गाइड म्हणून ओळख असलेल्या टाइम आऊटनं नुकतीच खाद्यपदार्थांसाठी जगातील टॉप-२० शहरांची यादी जाहीर केली. यात मुंबई शहरालनं आठवा क्रमांक पटकावला आहे. त्यात मुंबईत खाल्लाच पाहिजे असा पदार्थ म्हणजे वडापाव!

मुंबईकरांना शहरातील खाद्यपदार्थांबाबतचा नेहमीच अभिमान राहिला आहे. मुंबईत सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ चाखायला मिळतात. खाद्यपदार्थ्यांच्या वैविध्यतेबाबतही मुंबई एक पाऊल पुढे आहे. असंख्य खाद्यपदार्थांपैकी आघाडीवरच्या डीश म्हणजे मंच्युरियन, बटर चिकन आणि अर्थात मुंबईचा वडापाव अन् सोबत हिरवी चटणी.

मुंबई व्यतिरिक्त टॉप टेन शहरांमध्ये इटलीमधील नेपल्स पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर जोहान्सबर्ग, लिमा, हो ची मिन्ह सिटी, बीजिंग, बँकॉक, क्वालालंपूर, मुंबई, दुबई आणि पोर्टलँड. या शहरांचा समावेश आहे.

खाद्यपदार्थांच्या बाबतीत टॉप-२० शहरांची यादी पुढीलप्रमाणे…

१. नेपल्स (इटली)

२. जोहान्सबर्ग (द.आफ्रिका)

३. लिमा (पेरू)

४. हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम)

५. बिजिंग (चीन)

६. बँकॉक (थायलँड)

७. क्वालालंपूर (मलेशिया)

८. मुंबई (भारत)

९. दुबई (यूएई)

१०. पोर्टलँड (ओरेगॉन)

११. लिव्हरपूल (इंग्लंड)

१२. मेडलिन (कोलंबिया)

१३. सेव्हिल (स्पेन)

१४. पोर्टो (पोर्तुगल)

१५. मॅराकेच (मोरक्को)

१६. ल्योन (फ्रान्स)

१७. सिडनी (ऑस्ट्रेलिया)

१८. मॉन्ट्रियल (यूएन)

१९. ओसाका (जपान)

२०. कोपनहेगन (डेन्मार्क)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *