मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यानधारणा सुरू केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि एक्झिट पोलच्या निकालावर भाष्य करताना पंतप्रधान मोदींवर टिका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, एक्झिट पोलमध्ये सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला ८०० ते ९०० जागा देतील. कारण मोदींनी एवढे मोठे ध्यान केले आहे. मोदींनी साधना केली, तपस्या केली. त्यामानाने ३६० आणि ३७० जागा काहीच नाहीत. मोदींसारख्या तपस्वी आणि ध्यानमग्न माणसाला किमान ८०० जागा तरी मिळाल्या पाहिजे. तरच ते ध्यान मार्गी लागले, अशी टीका त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *