अशोक गायकवाड
रायगड : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनेच्या अनुषंगाने नवीन प्रशासकीय भवन, कर्जत, जि. रायगड येथे नियत्रंण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तरी कर्जत तालुक्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने कोणतीही आपत्ती किंवा पुर, दरड कोसळणे इत्यादी घटना घडल्यास नागरीकांनी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार डॉ. शीतल रसाळ यांनी केले आहे.
कर्जत :- मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने तहसिलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती कर्जत डॉ. शीतल रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय कर्जत प्रशासकीय भवन कर्जत येथे तालुक्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालय प्रमुखांची बैठक शनिवारी,(दि.३१) संपन्न झाली. आपत्कालीन परिस्थितीत समन्वय महत्वाचा आहे. असे मत तहसिलदार डॉ. शीतल रसाळ यांनी व्यक्त केले. सदर बैठकीस सचिन राऊत, निवासी नायब तहसिलदार कर्जत, बी.एस. कटकदौड, सहाय्यक निबंधक कर्जत, डी.जी.जोंधळे, प्रा.कृ.सं.केंद्र कर्जत, एस.आर.पाल, सहा. अभियंता, MSEB कर्जत, एस.डि.शिंदे, उ.वि.अ. रायगड ल.पा.उवि.क्र.१ कर्जत, प्रभाकर बी.बोरकर, स.ग.वि.अ., दिपक अशोक अडवाणी, म.जी.प्र.कर्जत, मंगेश पालांडे, कृ.प.ता.कृ.अ. कर्जत, अक्षय वि. भोसले, मृत व जलसंधारण कर्जत, निलेश देशमुख, पाटबंधारे उपविभाग कर्जत, बापू बहिरम, न.पा. कर्जत इ. उपस्थित होते. सन २०२४ च्या मान्सुनपूर्व तयारी अंतर्गत तालुक्यातील दरडप्रवण, धरणक्षेत्र, तलाव, धबधबे इ. ठिकाणी करावयाच्या उपाययोजनाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे कर्जत तालुक्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन उपाययोजनेच्या अनुषंगाने नवीन प्रशासकीय भवन, कर्जत, जि. रायगड येथे नियत्रंण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तरी कर्जत तालुक्यात नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने कोणतीही आपत्ती किंवा पुर, दरड कोसळणे इत्यादी घटना घडल्यास नागरीकांनी नियत्रंण कक्षातील दुरध्वनी क्रमांक -०२१४८-२२२०३७ तसेच भ्रमणध्वनी क्रमांक – ९३७३९२२९०९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार डॉ. शीतल रसाळ यांनी केले आहे.
