संजय केळकर यांचे आश्वासन

अनिल ठाणेकर

ठाणे : पुनर्विकासाच्या नावाखाली कुटुंबांची अशा फसवणूक करण्याऱ्या विकासकांची जिथे जिथे कामे सुरु असतील त्यावर टाच आणली पाहिजे. हे मोकाट सुटले तर पुनर्विकासाच्या नावाखाली अजून सामान्य कुटुंबांना.  या फसवणूक झालेल्या कुटुंबांना बरोबर घेऊन त्यांना मुदतीत न्याय मिळावा याकरिता मला जे जे म्हणून करावे लागेल ते मी करेन असे आ. संजय केळकर यांनी सांगितले.

पुनर्विकास मध्ये फसवणूक झालेल्या १६ सोसायट्यांतील २०० सभासदांनी रविवारी ठाण्यातील घंटाळी सहयोग मंदिर हॉल येथे आक्रोश बैठक घेतली. यावेळी त्यांनी आमदार संजय केळकर यांना निमंत्रित केले होते. यावेळी विद्याधार वैशंपायन, ॲड. सुभाष काळे, माजी नगरसेवक सुनेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

या आक्रोश बैठकीत फसवणूक झालेल्या सदस्यांनी आपली मते मांडली. आमची घोर फसवणूक जोशी एंटरप्रायझेस च्या विकासकांनी केली आहे. आमची घराची स्वप्ने त्यांनी धुळीस मिळवली आहेत. वर्ष भर भाडेपण नाही. २०२३ ला आम्हाला भाडे दिले तेही आम्ही सतत तगाद लावल्यामुळे आम्हाला मिळाले. आ. केळकर यांनी पाठबळ दिल्यामुळे आमच्या लढाईला मोठ बळ मिळाले असून आम्ही एकत्रित हा लढा आ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली देणार असल्याचे या सदस्यांनी सांगितले. यावेळी या फसवणूक झालेल्या सदस्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चिड व आक्रोश दिसत होता.  यावेळी आ. केळकर यांनी फसवणूक झालेल्या कुटुंबासोबत शेवट पर्यंत उभे राहून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या बैठकीत १६ सोसायटयांचे जवळ जवळ २०० सभासद उपस्थित होते. जोशी इंटरप्राझेस च्या कळके आणी त्यांच्या भागीदारांनी शेकडो कुटुंबांची जाणून बुजून फसवणूक केली आहे. अनेकांनी आपली साठवलेली पुंजी मधून घरे घेतली होती. पण या फसवणुकीमुळे ही कुटुंबे आपल्या हक्काच्या घरांपासून वंचित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *